गोल्डन ब्रदर्स! शिवाने आशियाई स्पर्धेत, तर मनिषने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकले सुवर्ण अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 08:06 AM2023-09-28T08:06:01+5:302023-09-28T08:06:20+5:30
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली.
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं होती. गुरुवारी वुशू मध्ये रोशिबिना देवीने रौप्यपदक जिंकून भारताच्या पदकाचे खाते उघडले. त्यापाठोपाठ १० मीटर एअर पिस्तुल सांघिक गटात भारताने सुवर्ण वेध घेतला... अर्जुन सिंग चिमा, सरबज्योत सिंग आणि शिवा नरवाल यांच्या टीमने सर्वाधिक १७३४-५०x गुणांसह गोल्डन कामगिरी केली. चीनला त्यांनी मागे टाकले.
GOLD MEDAL ALERT 🚨
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 28, 2023
Can you imagine the drama and the rollercoaster ride
India needed 2 10s to keep China away from Gold in 10m Air Pistol Team.
AND WE DID IT#AsianGames2023pic.twitter.com/xLzEmu70tZ
अर्जुन सिंग चिमा आणि सरबज्योत सिंग यांनी १० मीटर एअर पिस्तुल प्रकारच्या वैयक्तिक गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आशियाई स्पर्धेत शिवा नरवालने गोल्ड जिंकले असताना दुसरीकडे त्याचा भाऊ मनिष नरवाल याने पॅरा नेमबाजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल SH1 प्रकारात २३९.७ गुणांसह वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही पटकावले.
🇮🇳Manish Narwal takes gold for India in the P1-Men's 10m Air Pistol SH1 at #Lima2023.
— #ShootingParaSport #Lima2023 (@ShootingPara) September 27, 2023
🥇Manish Narwal 🇮🇳
🥈Jungnam Kim 🇰🇷
🥉Yan Xiao Gong 🇺🇸@Media_SAI@ParalympicIndia@asianparalympic@Paralympics@USAShootingpic.twitter.com/h7iCKV86FG
- रोशिबिना देवीने ( Roshibina Devi ) भारताच्या पदकाचे खाते उघडले. वूशू ( Wushu) मध्ये ६० किलो वजनी गटात रोशिबिनाने रौप्यपदक जिंकले. २०१८च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. तिला आज फायनलमध्ये चीनच्या वू एस्कविरुद्ध ०-२ अशी हार पत्करावी लागली.
- बॅडमिंटन - महिला सांघिक गटात भारताने ३-० अशी मंगोलियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. पी व्ही सिंधूने पहिली मॅच २१-२,२१-३ अशी जिंकली. त्यानंतर अस्मिता चलिहा व अनुपमा उपाध्याय यांनी विजय मिळवला.