Asian Games 2023: भारतानं 'बॅक टू बॅक' जिंकली पदकं, नेमबाजीनंतर 'या' खेळातही 'सिल्व्हर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 08:24 AM2023-09-24T08:24:12+5:302023-09-24T08:24:41+5:30
आशियाई स्पर्धा २०२३ च्या पहिल्याच दिवशी भारतानं पदकांची कमाई केली आहे.
आशियाई स्पर्धा २०२३ च्या पहिल्याच दिवशी भारतानं पदकांची कमाई केली आहे. भारतानं पहिल्याच दिवशी बॅक टू बॅक दोन पदकं जिंकली. भारतानं पहिलं रौप्य पदक नेमबाजीत पहिलं पटकावलं, तर त्यानंतर मेन्स डबल्स लाइटवेट स्कलमध्ये दुसरं रौप्य पदक मिळालं. या दोन पदकांसह भारतानं मेडल टॅलीमध्ये आपलं नाव कोरलं आहे.
महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाजीत भारतानं रौप्यपदक मिळवलं. दुसरे रौप्य पदक स्कलमध्ये मिळवलं. या स्पर्धेत लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारतीय पुरुषांनी बाजी मारली.
Hangzhou Asian Games: Mehuli Ghosh and Ramita Ashi Chouksey win silver medal in Women's Team 10 Metre Air Rifle with a score of 1886.0. pic.twitter.com/YiBix6q2is
— ANI (@ANI) September 24, 2023
नेमबाजीत 'रौप्य' कामगिरी
आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये नेमबाजीनं भारताची मेडल टॅलीचं खातं उघडलं. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिघांनी मिळून १८८६ गुण मिळवले. यामध्ये रमितानं ६३१.९ गुण, मेहुलीनं ६३०.८ तर आशीनं ६२३.३ गुण मिळवले.
Hangzhou Asian Games: Indian rowers Arjun Lal and Arvind Singh won silver in Men's Lightweight Double Sculls with a timing of 6.28.18.
(Pic Source: Indian Olympic Association) https://t.co/tBN878YjPcpic.twitter.com/bIeZAOz30w— ANI (@ANI) September 24, 2023
डबल्स स्कलमध्ये दुसरं रौप्य
नेमबाजीत रौप्यपदक जिंकल्यानंतर अवघ्या काही वेळातच भारताला डबल्स स्कलमध्ये विजय साजरा करण्याची आणखी एक संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट कॅटेगरीमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी ६:२८:१८ अशा वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. तर चीननं सुवर्ण पदकाची कमाई केली.