Asian Games 2023 : आई तशी लेक! भारताच्या हर्मिलन बैन्सने जिंकले दुसरे रौप्यपदक, २० वर्षांपूर्वी आईनं जिंकलेलं पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 05:11 PM2023-10-04T17:11:47+5:302023-10-04T17:12:33+5:30
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली.
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये विक्रमी पदकांची कमाई केली. भारताने आतापर्यंत ७४ पदकं जिंकली आणि ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकं ठरली. त्यापैकी सर्वाधिक २३ पदकं ही ॲथलेटिक्समध्ये मिळवलेली आहेत. भारताच्या हर्मिलन बैन ( harmilan Bains) हिने ८०० मीटर शर्यतीत चीनी खेळाडूला शेवटच्या क्षणाला मागे टाकून रौप्यपदक जिंकले. २००२मध्ये तिच्या आईने माधुरी सिंग यांनी याच क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले होते. हर्मिलनचे हे यंदाच्या आशियाई स्पर्धेतील दुसरे रौप्यपदक आहे, तिने यापूर्वी १५०० मीटर शर्यतीत पदक जिंकले होते.
२३ एप्रिल १९९८ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या हर्मिलनने राष्ट्रीय विक्रमासह १५०० मीटर शर्यत जिंकली होती. पंजाबच्या होशियारपूर येथील हर्मिलानने डोआबा पल्बिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तिने दक्षिण आशियाई स्पर्देत १५०० मीटर शर्यतीत पदक जिंकले होते. तिच्या आईनेही हा पराक्रम केला होता आणि २००३ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले होते.
2023: हर्मिलनने 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनमधील हांगझोऊ येथे 1500 मीटरमध्ये रौप्य पदक जिंकले ]
2023: तिने भुवनेश्वर येथील आंतरराज्य ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 1500m आणि 800m या दोन्ही प्रकारात रौप्य पदके जिंकली.
2021: तिने वारंगल येथील नॅशनल ओपन चॅम्पियनशिप 2021 मध्ये 1500 मीटरमध्ये 4:05.39 अशी वेळ नोंदवून सुनीता राणीचा 2002 मधील 4:06.03 चा विक्रम मोडून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
2021: तिने 2:02.57 अशी वेळ नोंदवली, पतियाळा येथील 2021 राष्ट्रीय स्पर्धेत 800 मीटरमध्ये तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी.
2020: खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये 1500 मीटर आणि 800 मीटरमध्ये प्रत्येकी सुवर्णपदक जिंकले.
2016: व्हिएतनामच्या हो ची-मिन्ह येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये तिने 1500 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. ती वेळा 4:33.02.