Asian Games 2023 : शेतकऱ्याच्या पोरीची रौप्य क्रांती! पारुल चौधरी अन् प्रिती लांबा यांनी भारतासाठी जिंकले पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 05:24 PM2023-10-02T17:24:03+5:302023-10-02T17:25:54+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आजच्या दिवसात भारताला एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये आजच्या दिवसात भारताला एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. कबड्डीत महिला संघाला आश्चर्यकारक बरोबरीवर समाधान मानावे लागले, तर हॉकीत पुरुषांनी बांगलादेशचा धुव्वा उडवला. अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद आज केली.
🇮🇳 𝗣𝗔𝗥𝗨𝗟 𝗕𝗔𝗚𝗦 𝗦𝗜𝗟𝗩𝗘𝗥! The National Record holder completes an Asian double with this silver medal.
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) October 2, 2023
🥇 Asian Athletics Championships 2023.
🥈 Asian Games 2022.
➡️ Follow @sportwalkmedia for schedule, results, medal and record alerts.@19thAGofficial@Media_SAI… pic.twitter.com/WzjGrfQ3xx
मेरठची चॅम्पियन मुलगी पारुल चौधरीची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. पारुल चौधरी ही शेतकऱ्याची मुलगी एकेकाळी तिच्या गावातून स्टेडियमपर्यंत पायी जात असे. ८ वर्षांपूर्वी पारुलने जो ध्यास विकसित केला होता त्यामुळेच आज ती देशातील प्रथम क्रमांकाची धावपटू बनली आहे. या चॅम्पियन मुलीने आतापर्यंत इतकी पदके जिंकली आहेत की संपूर्ण खोली पदकांनी भरून गेली आहे.
ITS SILVER AND BRONZE for India.
— Sundeep Misra (@MisraSundeep) October 2, 2023
Silver for Parul Choudhary and Preeti in 3000m Steeplechase
FABULOUS. SO WELL DONE#IndiaAtAsianGames#athletics#AsianGamespic.twitter.com/7LhxJ4K071
कबड्डी - २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.
हॉकी - भारताच्या पुरुष संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला १२-० असे नमवले. हरमनप्रीत सिंग ( ३), मनदीप सिंग ( ३), अभिषेक ( २), रोहिदास, उपाध्याय, गुरजंत सिंग आणि एन शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल केला.
टेबल टेनिस - भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदक जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले.