Asian Games 2023 : मणिपूर जळतंय, आई-वडिलांची चिंता; रोशिबिना देशासाठी लढली अन् रौप्य जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 07:45 AM2023-09-28T07:45:26+5:302023-09-28T07:46:03+5:30
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली.
Asian Games 2023 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा तिसरा दिवसही गाजवला. नेमबाजीत दोन सुवर्णपदक भारताने जिंकली. भारताच्या एकूण पदकांची संख्या ही २२ झाली असून त्यात ५ सुवर्ण, ७ रौप्य व १० कांस्यपदकं आहेत. आज रोशिबिना देवीने ( Roshibina Devi ) भारताच्या पदकाचे खाते उघडले. वूशू ( Wushu) मध्ये ६० किलो वजनी गटात रोशिबिनाने रौप्यपदक जिंकले. पण, तिच्या या कामगिरीला दाद मिळायला हवी. मणिपूरची रोशिबिना रोज आपल्या आई-वडिलांच्या चिंतेने हैराण असते.... मणिपूर जळतंय... आपले आई-वडील सुरक्षित आहेत का, ही चिंता तिला सतावते. याही परिस्थितीत ती लढल अन् देशासाठी रौप्यपदक जिंकले.
२०१८च्या आशियाई स्पर्धेत तिने कांस्यपदक जिंकले होते. तिला आज फायनलमध्ये चीनच्या वू एस्कविरुद्ध ०-२ अशी हार पत्करावी लागली.''दररोज मी माझ्या कुटुंबियांशी बोलते. पुढे त्यांच्याशी बोलता येईल की नाही ही भीती सतत मनात असते,''असे रोशिबिना फायनलला पोहोचल्यानंतर म्हणाली होती.
REMARKABLE ROSHIBINA🥈🌟
— SAI Media (@Media_SAI) September 28, 2023
Roshibina won a sparkling Silver medal in the Wushu women’s 60 kg category at the #AsianGames2022
Interestingly, Roshibina upgraded the color of her medal from bronze, which she won in 2018, Jakarta AG, to Silver this time.🔥🫡
Kudos, champ!… pic.twitter.com/5uygAMK8Ta
बॅडमिंटन - महिला सांघिक गटात भारताने ३-० अशी मंगोलियाविरुद्ध आघाडी घेतली आहे. पी व्ही सिंधूने पहिली मॅच २१-२,२१-३ अशी जिंकली. त्यानंतर अस्मिता चलिहा व अनुपमा उपाध्याय यांनी विजय मिळवला.