शानदार...भारताच्या सिफ्ट कौरची नेमबाजीत सुवर्ण कामगिरी; आता एकूण १८ पदकं ताफ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 11:10 AM2023-09-27T11:10:53+5:302023-09-27T11:11:46+5:30

Asian Games 2023: आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत नेमबाजीत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे.

Asian Games 2023: Sift Kaur Samra wins gold medal in women's 50m Rifle 3P event. | शानदार...भारताच्या सिफ्ट कौरची नेमबाजीत सुवर्ण कामगिरी; आता एकूण १८ पदकं ताफ्यात

शानदार...भारताच्या सिफ्ट कौरची नेमबाजीत सुवर्ण कामगिरी; आता एकूण १८ पदकं ताफ्यात

googlenewsNext

आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेत नेमबाजीत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे. सिफ्ट कौर आणि आसी चौकसे यांनी याच स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले आहेत. सिफ्ट कौर साम्राने ५० मीटर ३ पोझिशन रायफलमध्ये १०.२ गुण मिळवून सहज सुवर्णपदक जिंकले. 

आशियाई २०२३ मध्ये भारतासाठी एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिफ्ट कौर ही पहिली ऍथलीट आहे. तर भारताची नेमबाज आशी चौकसेनं कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक अशी एकूण १८ पदकं आली आहेत. 

 

Web Title: Asian Games 2023: Sift Kaur Samra wins gold medal in women's 50m Rifle 3P event.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.