Asian Games 2023 : भारताचे कांस्य क्षणात झाले रौप्य! ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत तिसरे येऊनही झाला चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:55 PM2023-10-02T18:55:33+5:302023-10-02T18:56:20+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले.
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये ॲन्सी सोजन एडाप्पिल्ली ( SOJAN EDAPPILLY Ancy) ने विक्रमी कामगिरी करताना लांब उडीत रौप्यपदक जिंकून दिले. अॅन्सीने तिसऱ्या प्रयत्नात ६.५६ मीटर लांब उडी मारली आणि रौप्यपदकासाठी ती पुरेशी ठरली. त्याचवेळी मैदानी स्पर्धेत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले शर्यतीत भारताने ३ मिनिटे १४.४३ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमासह तिसरे स्थान पटकावले अन् श्रीलंका दुसऱ्या व बहरिन ( ३:१४.०२ ) अव्वल स्थानावर होते.
🥈it is for the the Indian 4X400 m Mixed Relay Team at #AsianGames2022
— SAI Media (@Media_SAI) October 2, 2023
The quartet of Muhammed Ajmal, Ramraj Vithya, Ramesh Rajesh & #KheloIndia Athlete Venkatesan Subha clocked a new National Record timing of 3:14.34 to grab the🥈
Many congratulations to the team! Well… pic.twitter.com/KVcC6b4kR0
त्यामुळे सुरुवातीला भारताला कांस्यपदक विजेता म्हणून जाहीर केले गेले. अंतिम रेषा पार करताना भारतीय व श्रीलंकन खेळाडू यांच्यात थोडेसेच अंतर राहिले होते. श्रीलंकेच्या खेळाडूकडून त्याचवेळी चूक झाली आणि तिने दुसऱ्या लेनमध्ये पाय टाकला. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला अपात्र ठरवण्यात आले आणि भारताला रौप्यपदक विजेता जाहीर केले गेले. चौथ्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानच्या संघाला कांस्यपदक मिळाले.
- अॅथलेटिक्समध्ये आज महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरीने रौप्य आणि प्रिती लांबाने कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकात भर घातली. पारूलने ९ मिनिटे २७.६३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ आज नोंदवली, तर प्रिती ९ मिनिटे ४३.३२ सेकंदासह तिसरी आली. प्रितीनेही सर्वोत्तम वेळेची नोंद आज केली.
- कबड्डी - २०१० व २०१४च्या सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघाला अ गटातील पहिल्याच लढतीत चायनीस तैपेईकडून बरोबरीवर समाधानी राहावे लागले. शेवटच्या ७ सेकंदात तैपेईने अखेरच्या चढाईत गुण घेत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.
- हॉकी - भारताच्या पुरुष संघाने अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशला १२-० असे नमवले. हरमनप्रीत सिंग ( ३), मनदीप सिंग ( ३), अभिषेक ( २), रोहिदास, उपाध्याय, गुरजंत सिंग आणि एन शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल केला.
- टेबल टेनिस - भारताच्या सुतिर्था व अहिका मुखर्जी या बहिणींनी आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये भारताला ऐतिहासिक पदक जिंकून दिले. मुखर्जी बहिणींनी महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेतील दुहेरी विभागाचे कांस्यपदक पटकावले.