Asian Games: अदिती अशोकने रचला इतिहास, गोल्फमध्ये पदक मिळवणारी ठरली पहिली भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 10:05 AM2023-10-01T10:05:31+5:302023-10-01T10:13:28+5:30
Asian Games 2023: भारताची युवा गोल्फपटू अदिती अशोक हिने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. अदिती अशोक हिने आज गोल्फमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.
भारताची युवा गोल्फपटू अदिती अशोक हिने आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. अदिती अशोक हिने आज गोल्फमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये पदक जिंकणारी अदिती अशोक ही पहिली भारतीय गोल्फर ठरली आहे.
२०२१ मध्ये जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे अदिती अशोक ही चर्चेत आली होती. त्यावेळी तिला पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. मात्र कामगिरीत सातत्य ठेवत अदितीने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला. तिला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली असतील तरी रौप्य पदक पटकावत अदितीने नव्या इतिहासाला गवसणी घातली आहे.
🥈1️⃣𝙨𝙩 𝙚𝙫𝙚𝙧 𝙄𝙣𝙙𝙞𝙖𝙣 𝙒𝙤𝙢𝙚𝙣 𝙂𝙤𝙡𝙛𝙚𝙧 𝙩𝙤 𝙬𝙞𝙣 𝙈𝙚𝙙𝙖𝙡 𝙖𝙩 𝘼𝙨𝙞𝙖𝙣 𝙂𝙖𝙢𝙚𝙨⛳
— SAI Media (@Media_SAI) October 1, 2023
🇮🇳's Golfer @aditigolf clinches a Silver medal in women's individual event at the ongoing #AsianGames2022🫡
Her precise swings and unwavering focus have won her a coveted… pic.twitter.com/5JSqdHjZFi
अदिती अशोकने जिंकलेल्या रौप्यपदकाबरोबरच भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. भारतीय क्रीडापटूंनी या स्पर्धेत आतापर्यंत १० सुवर्ण, १५ रौप्य आणि १४ कांस्यपदके जिंकली आहेत. यात भारताला सर्वाधिक पदके ही नेमबाजीमध्ये मिळाली आहेत. नेमबाजीमध्ये भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण ८ रौप्य आणि ५ कांस्य अशी मिळून एकूण १९ पदके जिंकली आहेत.