Asian Games: ११ व्या दिवसाची शानदार सुरुवात; मंजू राणी अन् राम बाबूने जिंकले कास्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 08:38 AM2023-10-04T08:38:49+5:302023-10-04T08:40:34+5:30
कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली असून ६९ पदकांची कमाई केली आहे. त्यामध्ये, १५ सुवर्णपदकावर भारताचं नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी देशासाठी २६ सिल्व्हर व २६ कास्य पदके जिंकली आहेत. त्यातच, स्पर्धेतील भारताची ११ व्या दिवसाची सुरुवातही पदकानेच झाली. मंजू राणी आणि राम बाबू यांनी देशासाठी ७० वे पदक जिंकले. कास्य पदक मिळवत दोन्ही एथलेटसने उत्कृष्ट प्रदर्शन केले.
३५ किमी चालण्याच्या शर्यतीत मंजू राणी आणि राम बाबू यांनी सांघिक प्रकारात देशाला कास्य पदक जिंकून दिले. त्यामुळे, यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी हे ७० वे पदक जिंकण्यात आले आहे.
🚨 Bronze Medal Alert 🚨
— The Khel India (@TheKhelIndia) October 4, 2023
Medal No. 70 for India in Mixed 35Km Race Walk Team 🥉
Great Work Manju Rani and Ram Baboo 👏#AsianGames2022#IndiaAtAsianGamespic.twitter.com/LAYN7Zu6ff
दरम्यान, ११ व्या दिवशी अनेक भारतीय खेळाडू मैदानात उतरत आहेत. त्यामुळे, आजच्यादिवशी भारताला सुवर्णक्षणांची अपेक्षा आहे. तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या तेजस देवताले आणि ज्योति वेन्नम यांनी मिश्र सांघिक प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर, इतरही क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडू आज मैदान गाजवू शकतात. त्यामुळे, भारताला आज मोठ्या पदकांची अपेक्षा आहे.