१२ बोटं मावणारे शूज; भारताची सुवर्णकन्या स्वप्ना बर्मनला खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 11:11 AM2018-09-15T11:11:06+5:302018-09-15T11:40:07+5:30
आशियाई स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्वप्ना बर्मनला अखेर बारा बोट मावणारे बूट मिळणार आहेत.
नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या स्वप्ना बर्मनला अखेर बारा बोटं मावणारे बूट मिळणार आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण ( SAI) यांनी आदिदास या कंपनीशी करार करून स्वप्नासाठी विशेष बूट तयार करण्यास सांगितले आहे.
स्वप्नाने आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉन स्पर्धेत विक्रमी सुवर्ण जिंकले. या प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. स्वप्नाच्या पायाला बारा बोट आहेत आणि त्यामुळे तिच्या पायाच्या मापाची बूटच मिळत नव्हती. स्पर्धेला सामोरे जाताना तिला प्रचंड वेदना सहन करव्या लागल्या. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची शिकवण बालपणीच मिळाली असल्याने तिने सर्व अडचणींवर मात करत इतिहास घडवला.
Asian Games gold-medallist Swapna Barman will have customised shoes for her 12-toed feet soon as the Sports Authority of India (#SAI) has tied up with footwear company Adidas to ensure specially-designed gear for the heptathlete. pic.twitter.com/QjRGelALIY
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 14, 2018
" स्वप्नाबाबत माहिती मिळताच क्रीडा मंत्र्यांनी जकार्ताहून आम्हाला तिच्यासाठी विशेष बूट बनवण्यास सांगितले. हा मुद्दा आम्ही आदिदास कंपनीसमोर ठेवला आणि त्यांनी स्वप्नासाठी तशी बूट तयार करण्याची तयारी दर्शवली आहे,'' असे क्रीडा प्राधिकरणाच्या महासंचालक नीलम कपूर यांनी सांगितले.