शेतकऱ्याच्या पोरानं पदक जिंकलं! ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने फायनलमध्ये रुद्रांक्ष पाटीलला नमवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 09:33 AM2023-09-25T09:33:00+5:302023-09-25T09:33:39+5:30
हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : आशियाई स्पर्धा २०२३च्या दुसऱ्या दिवसाची भारतीयांनी सुवर्ण सुरुवात केली. नेमबाजांनी १० मीटर ...
हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : आशियाई स्पर्धा २०२३च्या दुसऱ्या दिवसाची भारतीयांनी सुवर्ण सुरुवात केली. नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. वैयक्तिक गटात ऐश्वर्यने कांस्यपदकाची कमाई केली.
गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले
रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला. फायनलमध्ये टॉप ८ स्पर्धकांना संधी मिळते अन् दिव्यांश ६२९.६ गुणांसह आठवा आला, परंतु त्याला फायनलमध्ये प्रवेश नाही मिळाला. कारण, एका देशातील दोनच स्पर्धकांना फायनलमध्ये संधी मिळते. रुद्रांक्ष व ऐश्वर्य यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना अव्वल चारमध्ये आपले स्थान पटकावत भारतासाठी पदक निश्चत केले.
सुवर्णपदकाच्या शर्यतीत भारताच्या नेमबाजांसमोर कोरियन आणि चीनच्या खेळाडूंचे आव्हान होते. या दोघांनी दमदार खेळ करताना २०८.७ गुण पटकावले आणि त्यामुळे टॉप थ्रीसाठी भारतीय खेळाडूंमध्ये शूट आऊट झालं. त्यात रुद्रांक्षला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यानंतर २२८.८ गुणांसह ऐश्वर्यने कांस्यपदक निश्चित केले.
कोण आहे ऐश्वर्य
ऐश्वर्यचा जन्म ३ फेब्रुवारी २००१ रोजी मध्य प्रदेशातील खारगोन जिल्ह्यातील रतनपूर गावात झाला. तीन भावंडांपैकी तो सर्वात धाकटा आहे. तो बऱ्याचदा त्याचे जमीनदार वडील वीर बहादूर यांच्याबरोबर शिकार करायला जात असे. चुलतभाऊ नवदीपसिंग राठौर यांच्याकडून त्याला नेमबाजी या खेळाबद्दल कळले. तोमरने २०१५ मध्ये भोपाळमधील मध्य प्रदेश नेमबाजी अकादमीमध्ये वैभव शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचे प्रशिक्षण घेणे सुरू केले. त्याने २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकले होते.