गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 08:57 AM2023-09-25T08:57:54+5:302023-09-25T09:00:47+5:30

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : नौकानयनमध्ये दोन कांस्यपदक पटकावली. भारताने नौकानयकमध्ये आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत.

Asian Games2023 : Shooting : bronze medal for India's Men's Quadruple Sculls team, Satnam Singh, Parminder Singh, Jakar Khan, Sukhmeet Singh clinch India's 5th medal in rowing.  | गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले

गतविजेत्यांना जेतेपद राखण्यात अपयश! भारतीय संघाचे ५.९६ सेकंदामुळे सुवर्णपदक हुकले

googlenewsNext

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 : भारतीय खेळाडूंनी आशियाई स्पर्धा २०२३ चा दुसऱ्या दिवसाची दणक्यात सुरुवात केली. नेमबाजांनी सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन पदकं जिंकली. नेमबाजीत 10m Men's Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर नौकानयनमध्ये दोन कांस्यपदक पटकावली. भारताने नौकानयकमध्ये आतापर्यंत ५ पदकं जिंकली आहेत.

World Record! भारताचे ३ नेमबाज अव्वल आठात! पण, फायनलमध्ये फक्त दोघांना प्रवेश; असं का? 


नौकानयन पुरूष सांघिक गटात ( Rowing Men's Four) जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांनी भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारत ६:१०.८१ मिनिटांच्या वेळेसह तिसरा आला. त्यानंतर नौकानयनपटूंनी Men's Quadruple Sculls सांघिक गटात कांस्यपदक जिंकले. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे आजच्या दिवसाचे तिसरे पदक ठरले. २०१८च्या विजेत्या भारतीय संघाला ६:०८.६१ मिनिटाच्या वेळेसह तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ५.९६ सेकंदाच्या फरकाने त्यांना सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. चीनने सुवर्ण, तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. नौकानयन क्रीडा प्रकारातील भारताचे हे पाचवे पदक ठरले. 


- दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला
- भारताचा जलतरणपटू श्रीहरी याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने २५.४३ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले अन् आता पदकासाठी उद्या तो शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल.  
- जलतरणपटू विरधवल खाडे आणि आनंद एएस यांना ५० मीटर फ्रीस्टाईल प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करता नाही आले. विरधवल २३.१२ सेकंदासह १३व्या, तर आनंद २३.५४ सेकंदासह १८व्या स्थानावर राहिला.   

Web Title: Asian Games2023 : Shooting : bronze medal for India's Men's Quadruple Sculls team, Satnam Singh, Parminder Singh, Jakar Khan, Sukhmeet Singh clinch India's 5th medal in rowing. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.