World Record! भारताचे ३ नेमबाज अव्वल आठात! पण, फायनलमध्ये फक्त दोघांना प्रवेश; असं का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 08:34 AM2023-09-25T08:34:11+5:302023-09-25T08:35:49+5:30

हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 :  १९ व्या आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली.

Asian Games2023 : Shooting : Not only a Gold medal, but all 3 shooters finish in Top 8, but  as per AG rule: max only 2 from each country can qualify for Final, So Aishwary & Rudrankksh are through to Final, Divyansh misses out | World Record! भारताचे ३ नेमबाज अव्वल आठात! पण, फायनलमध्ये फक्त दोघांना प्रवेश; असं का? 

World Record! भारताचे ३ नेमबाज अव्वल आठात! पण, फायनलमध्ये फक्त दोघांना प्रवेश; असं का? 

googlenewsNext

 हांगझोउ (चीन) Asian Games2023/ Asian Games2022 :  १९ व्या आशियाई स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली. नेमबाजीत 10m Men's Air Rifle प्रकारात भारताने सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या नेमबाजांनी भारताला पहिले सुवर्णपद जिंकून दिले. त्यांनी १८९३.७ गुणांची कमाई करताना वर्ल्ड रेकॉर्डही नोंदवला अन् आशियाई स्पर्धा विक्रमही मोडला. रुद्रांक्षने ६३२.५ गुणांसह आणि ऐश्वर्यने ६३१.६ गुणांसह अनुक्रमे तिसरे व पाचवे स्थान पटकावून वैयक्तिक गटाच्या फायनलमध्येही प्रवेश मिळवला. फायनलमध्ये टॉप ८ स्पर्धकांना संधी मिळते अन् भारताचा दिव्यांश ६२९.६ गुणांसह आठवा आला, परंतु त्याला फायनलमध्ये प्रवेश नाही मिळाला. 


- नौकानयन पुरूष सांघिक गटात ( Rowing Men's Four) जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांनी भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारत ६:१०.८१ मिनिटांच्या वेळेसह तिसरा आला.  


- भारताचा जलतरणपटू श्रीहरी याने ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला. त्याने २५.४३ सेकंदाची वेळ नोंदवून तिसरे स्थान पटकावले अन् आता पदकासाठी उद्या तो शर्थीचे प्रयत्न करताना दिसेल.  

दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील आणि ऐश्वर्य तोमर या भारतीय नेमबाजांना चीन व दक्षिण कोरियाच्या खेळाडूंकडून कडवी टक्कर मिळाली. भारतीय खेळाडूंनी पहिल्या चार फेरीत ३१३.७, ३१५.९, ३१३.७, ३१५.९, ३०८.२ आणि ३१५.८ असे  एकूण १८९३.७ गुणांची कमाई केली अन् चीनचा वर्ल्ड रेकॉर्डही मोडला. चीनने १९ ऑगस्ट २०२३ मध्ये बाकू येथे १८९३.३ गुणांची कमाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. 


या फायनमधील कामगिरीच्या जोरावर भारतीय नेमबाजांसमोर १० मीटर एअर रायफल वैयक्तिक गटाच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य होते. अव्वल ८ खेळाडू फायनलमध्ये खेळणार आहेत आणि भारताचे तिन्ही स्पर्धक अव्वल आठमध्ये आले, परंतु नियमानुसार एका देशाच्या दोनच खेळाडूंना फायनलमध्ये खेळता येत असल्याने ८व्या क्रमांकावर असूनही दिव्यांशला बाहेर जावे लागले. 

Web Title: Asian Games2023 : Shooting : Not only a Gold medal, but all 3 shooters finish in Top 8, but  as per AG rule: max only 2 from each country can qualify for Final, So Aishwary & Rudrankksh are through to Final, Divyansh misses out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.