Asian Para games 2018 : भारताच्या सुयश जाधवची सुवर्ण कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:03 PM2018-10-08T18:03:33+5:302018-10-08T18:04:35+5:30
Asian Para games 2018: भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले.
जकार्ता, आशियाई पॅरा स्पर्धा 2018 : भारताच्या सुयश जाधवने आपली वैयक्तिक कामगिरी उंचावताना आशियाई पॅरा स्पर्धेत भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. जलतरणपटू सुयशने पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय प्रकारात 32.71 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी त्याने 200 मीटर वैयक्तिक मीडले आणि 50 मीटर फ्रिस्टाईल गटात कांस्यपदकांची कमाई केली आहे.
What a swim to a GOLD!
— SAIMedia (@Media_SAI) October 8, 2018
Winning a GOLD in men’s 50m butterfly S7 event at @asianpg2018 by clocking 0:32:71, @SuyashNJadhav has made us super proud.
It is his 3rd medal at #AsianParaGames2018.
Many congratulations!🥇#IndiaAtParaAG@ParalympicIndia#ParaSwimming#KheloIndia🇮🇳 pic.twitter.com/sMBITp0mca
सोमवारी झालेल्या 50 मीटर बटरफ्लाय S7 (6-7) गटात सुयशने चीन व थायलंडच्या जलतरणपटूंना पिछाडीवर टाकले. चीनच्या यांग होंगला ( 33.54 से.) आणि थायलंडच्या पयुंगसकुल बूनयारित ( 38.09 से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकता आले. भारताचे हे स्पर्धेतील आत्तापर्यंतचे 14 वे पदक ठरले. भारताने 2 सुवर्ण, 5 रौप्य व 7 कांस्यपदक जिंकले आहे.