आशियाई क्रमवारी : भारताचा अव्वल टेनिसपटू; युकी अकराव्या स्थानी

By admin | Published: July 28, 2016 08:21 PM2016-07-28T20:21:54+5:302016-07-28T20:21:54+5:30

डेव्हीस चषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीला आशियाई क्रमवारीत समावेश करण्याचा निर्णय आशियाई टेनिस संघटनेने (एटीएफ) घेतल्यानंतर भारताच्या साकेत मिनेनी याने

Asian ranking: India's top tennis player; Yuki ranked in eleventh position | आशियाई क्रमवारी : भारताचा अव्वल टेनिसपटू; युकी अकराव्या स्थानी

आशियाई क्रमवारी : भारताचा अव्वल टेनिसपटू; युकी अकराव्या स्थानी

Next

साकेत मिनेनी १२व्या स्थानी

नवी दिल्ली : डेव्हीस चषक स्पर्धेत केलेल्या कामगिरीला आशियाई क्रमवारीत समावेश करण्याचा निर्णय आशियाई टेनिस संघटनेने (एटीएफ) घेतल्यानंतर भारताच्या साकेत मिनेनी याने आशियाई क्रमवारीत चांगले स्थान पटकावताना भारताचा अव्वल टेनिसपटू म्हणून स्थान पटकावले.

मिनेनी सध्या ३८६ गुणांसह आशियाई क्रमवारीत ११ व्या स्थानी असून तो अव्वल भारतीय खेळाडू आहे. तर, त्याच्यानंतर बरोबर एका स्थानाने १२व्या स्थानी युकी भांबरी (३८१) असून तो भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याचवेळी जपानचा केई निशिकोरी तब्बल ४२९० गुणांसह आशियाई क्रमवारीत अव्वल असून जागतिक क्रमवारीत तो सध्या सहाव्या स्थानी आहे.

विशेष म्हणजे, जागतिक क्रमवारीवर नजर टाकल्यास युकी भारताचा अव्वल खेळाडू असून तो जागतिक क्रमवारीत १५१व्या स्थानी आहे. तर, साकेत त्याच्यानंतर १५२ व्या स्थानी विराजमान आहे. चंडिगड येथे कोरियाविरुद्ध झालेल्या आशिया - ओशियाना गटात झालेल्या लढतीत भारताने ४-१ अशी बाजी मारली होती आणि यामध्ये स्एकेरी लढत जिंकताना साकेतने भारतासाठी महत्त्वाची कामगिरी केली होती. त्याचवेळी दुखापतीमुळे युकीने या स्पर्धेतून माघार घेतली होती.
दुसरीकडे भारताचा अन्य एक एकेरी खेळाडू रामकुमार रामनाथन जागतिक क्रमवारीत सध्या १९६ व्या स्थानी असून २८७ गुणांसह आशियाई क्रमवारीत १५व्या स्थानी आहे. रामनाथनने डेव्हीस कपमध्ये एक सामना जिंकताना एक सामना गमावला होता. 
..........................................

एटीएफने आशियाई क्रमवारीमध्ये बदल करताना डेव्हीस चषक स्पर्धा आणि आशियाई टेनिस टूर सामन्यांतील कामगिरींना क्रमवारीमध्ये सामिल करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीमध्ये आशियाई टेनिस टूर एटीपी सुरु झाल्यानंतर आशियाई क्रमवारी पध्दत बदलण्याची चर्चा झाली. एटीएफनुसार जे खेळाडू एटिएफमध्ये खेळत आहेत, तसेच आशिया - ओशियानामध्ये आपल्या देशासाठी खेळले आहेत, अशा खेळाडूंच्या कामगिरीचा क्रमवारीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. यंदाच्या १५ ते १७ जुलै दरम्यान झालेल्या डेव्हीस चषक विभागीय सामन्यांतील कामगिरीचा क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Asian ranking: India's top tennis player; Yuki ranked in eleventh position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.