आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 04:36 AM2017-12-12T04:36:16+5:302017-12-12T04:36:25+5:30

सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या १० व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी २०१८ मध्ये होत असलेल्या युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला.

Asian Shooting: Indian youth kicked off 21 medals, earned 'Kota' for upcoming Youth Olympics | आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला

आशियाई नेमबाजी : भारतीय युवांनी केली २१ पदकांची लयलूट, आगामी युवा आॅलिम्पिकसाठी ‘कोटा’ही मिळवला

Next

नवी दिल्ली : सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी जपान (वाको सिटी) येथे पार पडलेल्या १० व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई करत आगामी २०१८ मध्ये होत असलेल्या युवा आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी कोटाही मिळवला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारताने चार पदकांची कमाई करताना ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्य अशी स्पर्धेत एकूण २१ पदकांची लयलूट केली.
सौरभने अंतिम दिवशी पुरुषांच्या १० मीटर पिस्तुल युवा स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले. तसेच मनुने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात रौप्यपदकावर नाव कोरले. अंतिम दिवसाच्या सुरुवातीलाच ज्युनिअर महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात ज्युनिअर विश्व चॅम्पियन यशस्विनी सिंग देसवाल आणि महिमा अग्रवाल यांनी अंतिम फेरी गाठली. त्याचवेळी, योगिता ३७२ गुणांसह अकाराव्या स्थानावर राहिली. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत यशस्विनी आणि महिमा दोघीही पदक जिंकण्यात अपयशी ठरल्या असल्या, तरी सांघिक गटात मात्र भारतीय त्रिकुटाने ११२८ गुणांचा वेध घेत रौप्यवेध घेतला. शाहू मानेने स्पर्धेच्या दुसºया दिवशी युथ आॅलिम्पिकचा कोटा मिळविला होता.

- पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल युवा गटात दोन भारतीय
खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. पात्रता फेरीत अर्जुन सिंग चीमा (५७७) अव्वल स्थानी राहिला, तर सौरभने ५७३ गुणांसह तिसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, सुरिंदर सिंग ५६१ गुणांसह दहाव्या स्थानावर राहिला. आठ खेळाडूंच्या अंतिम फेरीत सौरभने जबरदस्त प्रदर्शन करताना सर्वाधिक २४३.१ गुणांसह सुवर्ण पटकावले. यासह त्याने युवा आॅलिम्पिक स्पर्धेचा कोटाही मिळवला. त्याचबरोबर सौरभ, सुरिंदर आणि अर्जुन यांनी सांघिक गटात सर्वाधिक १७११ गुणांसह सुवर्णपदकावर कब्जा केला.
- महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटाची अंतिम फेरी गाठणारी मनु एकमेव भारतीय ठरली. पात्रता फेरीत ३८२ गुणांसह अव्वल स्थान पटकावणारी मनु अंतिम फेरीत मात्र अडखळली. यामुळे १० शॉट्स नंतर ती थेट आठव्या स्थानी घसरली. मात्र, येथून तिने जबरदस्त पुनरागमन करताना थेट रौप्यपदकाला गवसणी घातली.
- या वेळी चीनच्या जियारुशुआन शियाओने केवळ ०.१ गुणाच्या आघाडीने सुवर्ण पटकावले. शियाओने २३६.१, तर मनुने २३६.० गुणांसह वर्चस्व राखले.

Web Title: Asian Shooting: Indian youth kicked off 21 medals, earned 'Kota' for upcoming Youth Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.