भारताने जिंकली आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप
By admin | Published: July 6, 2017 01:50 AM2017-07-06T01:50:17+5:302017-07-06T01:50:17+5:30
भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी येथे लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत
बिशकेक (किर्गीस्तान) : भारताचा स्टार खेळाडू पंकज अडवाणी याने बुधवारी येथे लक्ष्मण रावतच्या साथीने अंतिम फेरीत पाकिस्तानला धूळ चारत आशियाई सांघिक स्नूकर चॅम्पियनशिप जिंकली.
सर्वात आधी अडवाणीने मोहंमद बिलालविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानी खेळाडूने अडवाणीविरुद्ध फाऊलने पहिला
गुण मिळवला; परंतु भारतीय
खेळाडूने ८३ च्या शानदार ब्रेकने जोरदार मुसंडी मारत बेस्ट आॅफ फाइव्ह फायनलमध्ये पहिला फ्रेम आपल्या नावावर केला. दुसरीकडे त्याचा सहकारी रावतनेदेखील अशाच प्रकारची सर्वोत्तम कामगिरी करताना निराश केले नाही. त्याने संधीचे सोने करताना बाबर मसिह याला धूळ चारली. (वृत्तसंस्था)
दुहेरीतही भारताने पाकिस्तानचा ३-0 असा धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, अडवाणी याने सांघिक स्पर्धेत एकही वैयक्तिक लढत गमावलेली नाही. भारत अ संघात मलकीतसिंह यांचादेखील समावेश होता.
प्रशिक्षक म्हणून अशोक शांडिल्य होते. अडवाणीचे हे या हंगामातील दुसरे आशियाई आणि एकूण आठवे (सहा बिलियर्ड्स, एक ६ - रेड आणि एक टीम स्नूकर) विजेतेपद आहे, तर रावत आणि सिंह यांच्यासाठी हे पहिले अजिंक्यपद ठरले आहे.