आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : साक्षी, विनेश, दिव्याला रौप्यपदक

By admin | Published: May 12, 2017 06:45 PM2017-05-12T18:45:38+5:302017-05-12T22:07:45+5:30

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि दिव्या काकरानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Asian Wrestling Championship: Sakshi, Vinesh, Dilapad Medal | आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : साक्षी, विनेश, दिव्याला रौप्यपदक

आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप : साक्षी, विनेश, दिव्याला रौप्यपदक

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणा-या साक्षी मलिक, विनेश फोगट आणि दिव्या काकरानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या साक्षीला 60 किलो वजनी गटात जापानच्या रिसाको कावाईने पराभूत केले. विनेशला (55) तर, दिव्याला (69) किलो वजनी गटात रौप्यपदक मिळाले. 

रिओ ऑलिंपिकनंतर आंतरराष्ट्रीय सर्कीटमध्ये पदार्पण करणा-या साक्षीला कावाईने अवघ्या 2 मिनिट 44 सेकंदात 10-0 ने पराभूत केले. रिओ ऑलिंपिकमध्ये कावाईने 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. विनेश फोगट जापानच्या सा नानजोकडून 4-8 असा पराभव झाला. दिव्या काकरानला जापानच्याच सारा दोशोने 0-8 असे पराभूत केले.

वजन गट वाढविल्यानंतर ५० वरून प्रथमच ६० किलो गटात सहभागी झालेल्या साक्षीला अंतिम फेरीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. २४ वर्षांच्या साक्षीने उपांत्यपूर्व फेरीत उझबेकिस्तानची नबीरा एसेनबायेव्हा हिला ६-२ ने नमविल्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत अयायुलिम  कासिमोवा हिला १५-३ ने पराभूत केले. निवेशची वाटचाल सोपी झाली. तिने महिलांच्या ५५ किलो गटात उपांत्यपूर्व लढतीत उझबेकिस्तानची सेवारा इशमुरा हिच्यावर १०-० ने आणि उपांत्य लढतीत चीनची झांग हिच्यावर ४-० ने विजय नोंदविला.

दिव्याचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास प्रभावी ठरला. तिने तायपेईची चेन ची हिला २-० ने आणि उपांत्य लढतीत कोरियाची हियोनयोंग हिला १२-४ ने धूळ चारली. महिला गटात ४८ किलो गटात रितू फोगाट हिला मात्र सेमीफायनलमध्ये जपानची युई सुसाकी हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला. रितू कांस्य पदकाच्या लढतीत कायम आहे. ५३ किलो गटात पिंकी पहिल्याच सामन्यात पराभूत झाली

Web Title: Asian Wrestling Championship: Sakshi, Vinesh, Dilapad Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.