Asian Wrestling Championships : महाराष्ट्राच्या राहुल आवारेची कांस्यपदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:06 AM2020-02-24T11:06:38+5:302020-02-24T11:07:46+5:30
Asian Wrestling Championships : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली.
नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत वर्चस्व गाजवताना 20 पदकांची कमाई केली. भारतानं ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण आणि चार कांस्यपदक जिंकली. महिला गटात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदकं, तर पुरुषांच्या फ्री स्टाईल गटात एक सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकली.
स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारताला जितेंदरने 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानं कझाकिस्तानच्या कैसानोव्ह डॅनियारवर 3-1 असा विजय मिळवला. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि 2019च्या आशियाई व जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या राहुल आवारेनं 61 किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत इराणच्या डॅस्टन माजीद आल्मासचे आव्हान 5-2 असे परतवून लावले आणि कांस्यपदक जिंकले. ''या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या निर्धाराने मी आलो होतो. त्यामुळे कांस्यपदक जिंकल्यानं निराश आहे,''अशी प्रतिक्रिया राहुलनं दिली.
अखेरच्या दिवशी दीपक पुनियानं 86 किलो वजनी गटात इराकच्या अल ओबैदी इसा अब्दुलसलाम अब्दुलवाहाबवर 10-0 असा विजय मिळवून कांस्यपदक नावावर केले.
भारताचे पदक विजेते खेळाडू
- ग्रीको रोमन -
55 किलो - कांस्यपदक - अर्जुन हलाकुर्की
67 किलो - कांस्यपदक - आशू
72 किलो - कांस्यपदक - आदित्य कुंडू
87 किलो - सुवर्णपदक - सुनील कुमार
97 किलो - कांस्यपदक - हरदीप
- महिला गट
50 किलो - रौप्यपदक - निर्मला देवी
53 किलो - कांस्यपदक - विनेश फोगाट
55 किलो - सुवर्णपदक - पिंकी
57 किलो - कांस्यपदक - अंशू
59 किलो - सुवर्णपदक - सरिता
65 किलो - रौप्यपदक - साक्षी मलिक
68 किलो - सुवर्णपदक - दिव्या काकरन
72 किलो - कांस्यपदक - गुरशरन प्रीत कौर
- पुरुष फ्री स्टाईल
57 किलो - सुवर्णपदक - रवी कुमार
61 किलो - कांस्यपदक - राहुल आवारे
65 किलो - रौप्यपदक - बजरंग पुनिया
74 किलो - रौप्यपदक - जितेंदर
79 किलो - रौप्यपदक - गौरव बलियान
86 किलो - कांस्यपदक - दीपक पुनिया
97 किलो - रौप्यपदक - सत्यवर्त कॅडीयन