जोकोविच डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूने

By admin | Published: June 30, 2016 08:26 PM2016-06-30T20:26:41+5:302016-06-30T20:44:37+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे.

Aside from making changes in Djokovic Davis Cupcade format | जोकोविच डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूने

जोकोविच डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूने

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ३० : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे.
टेनिसचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचची लढत ब्रिटनच्या अँडी मरेशी होणार आहे. मॅराथॉन मॅन नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांना आपापल्या संघांना विजय मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांदरम्यान ब्लॉकबस्टर लढत १५ ते १७ जुलैदरम्यान होणार आहे.
जोकोविच म्हणाला, ह्यनिश्चितपणे मी डेव्हिस चषकाच्या स्वरूपात बदल करण्याच्या बाजूचा आहे. या स्वरूपात जास्त खेळ होऊ शकत नाही. युरोपियन चॅम्पियनशिप आणि विश्वचषकात ज्याप्रमाणे फुटबॉलचे स्वरूप असते तसेच स्वरूप टेनिसमध्येही लागू करण्याची आवश्यकता आहे. एक अथवा दोन वर्षांत एकच स्पर्धेचे आयोजन व्हायला हवे. टेनिस वेळापत्रकातही काही अंतर असणे आवश्यक आहे. ज्यामुळे टेनिसपटंूनाच नव्हे तर चाहते आणि मीडियालादेखील त्यावर काम करण्याची संधी मिळेल.ह्ण
जोकोविचने २00४ मध्ये त्यात पदार्पण केले होते. त्याने डेव्हिस चषकात २0१२ आणि २0१४ मध्ये सहभाग नोंदवला नव्हता. १२ वेळेसचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच म्हणाला, सध्याच्याच पद्धतीने स्पर्धा होत राहिल्यास ती खेळाडूंसाठी योग्य ठरणार नाही. त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे.
जोकोविचने बुधवारी फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मिनारिनो याचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठली. त्याचबरोबर त्याने सलग ३0 सामने जिंकण्याचा विक्रमदेखील आपल्या नावावर केला.

 

Web Title: Aside from making changes in Djokovic Davis Cupcade format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.