हरियाणा सरकारकडून आश्वासन अद्याप अपूर्ण

By admin | Published: March 5, 2017 04:04 AM2017-03-05T04:04:28+5:302017-03-05T04:04:28+5:30

रिओ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे

The assurance from the Haryana Government is still incomplete | हरियाणा सरकारकडून आश्वासन अद्याप अपूर्ण

हरियाणा सरकारकडून आश्वासन अद्याप अपूर्ण

Next

नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती महिला मल्ल साक्षी मलिकने स्पष्ट केले.
साक्षीने टिष्ट्वट केले, ‘पदक पटकावण्याचे आश्वासन मी पूर्ण केले; पण हरियाणा सरकार आश्वासन कधी पूर्ण करणार? मी आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर हरियाणा सरकारतर्फे केलेली घोषणा केवळ मीडियासाठी होती?’
साक्षीने ५८ किलो फ्रीस्टाईलमध्ये गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिला महिला मल्ल ठरली होती. या ऐतिहासिक कामगिरीनंतर हरियाणा सरकारने किमान ३.५ कोटी रुपयांच्या प्रोत्साहन व नगदी पुरस्कारांची
घोषणा केली होती.आॅलिम्पिकपूर्वी हरियाणा सरकारने सुवर्णपदक पटकावणाऱ्या राज्यातील खेळाडूंना ६ कोटी, रौप्यपदक पटकाणाऱ्या खेळाडूंना ४ कोटी तर कांस्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना २.५ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: The assurance from the Haryana Government is still incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.