विश्वविक्रम! भारताचा 'गोल्ड मॅन', पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुमितने जिंकलं 'सुवर्ण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:42 PM2023-07-13T16:42:56+5:302023-07-13T16:43:42+5:30

Para Athletics World Championships 2023 : सध्या पॅरिसमध्ये पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ चा थरार रंगला आहे.

at Para Athletics World Championships 2023, Paris Sumit antil won gold medal for india with a  he produced a throw of 70.83m New World Record | विश्वविक्रम! भारताचा 'गोल्ड मॅन', पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुमितने जिंकलं 'सुवर्ण'

विश्वविक्रम! भारताचा 'गोल्ड मॅन', पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुमितने जिंकलं 'सुवर्ण'

googlenewsNext

sumit antil javelin throw :  सध्या पॅरिसमध्ये पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ चा थरार रंगला आहे. भारताचा भालाफेकपटू सुमित अंतीलने ऐतिहासिक कामगिरी करत विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याने त्याचा स्वत:चाच विक्रम मोडत F64 प्रकारामध्ये तब्बल ७०.८३ मीटर भाला फेकला. लक्षणीय बाब म्हणजे आपल्या पहिल्याच प्रयत्नात सुमितने विश्वविक्रमाला गवसणी घातली. दरम्यान, पुष्पेंद्र सिंगने देखील F43 प्रकारात ६३.०९ मीटर भाला फेकून जागतिक विक्रम केला.

सुमितने विश्वविक्रमासह भारतालासुवर्ण पदक जिंकून दिले. तर ऑस्ट्रेलियन खेळाडूला रौप्य आणि श्रीलंकेच्या खेळाडूला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. 

कोण आहे रेकॉर्ड ब्रेकर सुमित अंतील?
सुमित अंतीलने टोकिया पॅरालिम्पिक २०२० मध्ये पुरूषांच्या F64 प्रकारात ६८.५५ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले होते. अंतिलचा जन्म ७ जून १९८८ साली हरयाणाच्या सोनिपत येथे झाला. एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या या शिलेदाराने अनेक मोठ्या व्यासपीठावर सुवर्ण कामगिरी केली आहे. लहानपणापासून कुस्तीची आवड असलेल्या सुमितने भालाफेकपटू म्हणून जगभर आपली ओळख निर्माण केली आहे. 

Web Title: at Para Athletics World Championships 2023, Paris Sumit antil won gold medal for india with a  he produced a throw of 70.83m New World Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.