'डेरवण यूथ गेम्स' ॲथलेटिक्समध्ये पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू चमकले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 06:44 PM2023-03-08T18:44:00+5:302023-03-08T18:44:43+5:30
चिपळूण - एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित डेरवण यूथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धांतील सामने रंगत आहेत.
चिपळूण - एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित डेरवण यूथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धांतील सामने रंगत आहेत. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली.
डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात शिवजयंतीनिमित्त ‘डीवायजी २३’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील विविध क्रीडा स्पर्धांत राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने आलेले खेळाडू सहभागी होत आहेत. २०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुली ) स्पर्धेत साताऱ्याची निकिता पवारने सुवर्णपदक पटकाविले. ८०० मीटर धावणे ( १६ वर्षांखालील मुली ) सांगलीच्या अनुष्का चव्हाणने सुवर्णपदक मिळविले. गोळाफेकमध्ये ( १४ वर्षांखालील मुले ) सांगलीच्या अनिरुद्ध नलावडेने सुवर्णपदक तर मुलींच्या गटात सांगलीच्या सिद्धी शिर्केने सुवर्णपदक पटकाविले. लांब उडी स्पर्धेत ( १८ वर्षांखालील मुले ) सांगलीच्या धैर्यशील ढेरे आणि साताराच्या वेदांत मोरे ( १६ वर्षांखालील मुले ) यांनी सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्समधील १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, रिले, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा सुरू असून, त्यासाठी एकूण ८७८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तर रिलेच्या एकूण १०६ संघांमध्ये चुरस रंगणार आहे.
स्पर्धेचे निकाल
२०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुली )
१ निकिती पवार, सातारा
२ तनिष्का दांगट, पुणे
३ सानिका मोरे, कोल्हापूर
८०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुले )
१ स्वराज जोशी, रत्नागिरी
२ अभिजीत वागरे, सांगली
३ उमेश अजमाने, सातारा
८०० मीटर धावणे ( १६ वर्षांखालील मुली )
१ अनुष्का चव्हाण, सांगली
२ पद्मिनी भिटाळे, रत्नागिरी
३ आयेश मुजावर, कोल्हापूर
४ बाय ५० मिश्र रिले ( १० वर्षांखालील )
एसएसए, कोल्हापूर
वेदांत अॅथलेटिक क्लब, कोल्हापूर
आश्रमशाळा, रत्नागिरी
४ बाय १०० मिश्र ( १८ वर्षांखालील )
हिरकणी, सातारा
एनपी स्पोर्टस, कोल्हापूर
एसव्हीजेसीटी, डेरवण
४ बाय १०० मिश्र ( १६ वर्षांखालील )
टीएमसीपीवाय, ठाणे
गुरुकूल स्कूल, सातारा
एसव्हीजेसीटी, डेरवण
लांब उडी ( १६ वर्षांखालील मुले )
१ वेदांत मोरे, सातारा
२ ऋग्वेद आंबे, सांगली
३ हर्षवर्धन पाटील, कोल्हापूर
लांब उडी ( १६ वर्षांखालील मुली )
अदा पठाण, ठाणे
जान्हवी खैरनार, नाशिक
श्रेष्ठा शेट्टी, ठाणे
लांब उडी ( १८ वर्षांखालील मुली )
धैर्यशील ढेरे, सांगली
अली शेख, ठाणे
प्रमोद जाधव, सांगली
गोळाफेक
( १४ वर्षांखालील मुले )
अनिरुद्ध नलावडे, सांगली
अथर्व परब, ठाणे
आयुष खाप, सातारा
( १४ वर्षांखालील मुली )
सिद्धी शिर्के, सांगली
प्रिशा नाईक, ठाणे
साईशा पवार, ठाणे
पुण्याच्या अक्षज पाटील बुद्धिबळपटूला सुवर्ण
बुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अक्षज पाटीलने सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक कोल्हापूरच्या शंतनू पाटीलने तर कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटीलने कांस्यपदक मिळविले. मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा मान पद्मश्री वैद्य, रत्नागिरी, सई प्रभूदेसाई रत्नागिरी आणि भूमी कामत, सिंधुदुर्ग या बुद्धिबळपटूंनी मिळविला.
वॉल क्लायम्बिंगवर पुण्याचे वर्चस्व
वॉल क्लायम्बिंग या स्पर्धेवर पुणे आणि लोणावळा येथील खेळाडूंनी पूर्णपणे वर्चस्व गाजविल्याचे पाहायला मिळाले. १० वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १८ वर्षांखालील मुले आणि मुली या सर्वच गटांमध्ये तीनही क्रमांक पुणे आणि लोणावळा येथील खेळाडूंनी पटकाविले.