Asia Cup 2023 : ॲथलेटिक्समध्ये पहिलं पदक! किरणने ७२ वर्षांचा दुष्काळ संपवला, कॉन्स्टेबलच्या पोरीची कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 07:46 PM2023-09-29T19:46:13+5:302023-09-29T19:47:49+5:30
Asia Cup 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली
Asia Cup 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये मैदानी स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आणि किरण बालियान ( Kiran Baliyan) हिने पदकाचे खाते उघडले. गोळाफेक स्पर्धेत किरणनने १७.३६ मीटर लांब गोळा फेकून कांस्यपदक नावावर केले. १९५१ नंतर ( बार्बरा वेबस्टर) आशियाई स्पर्धेत गोळा फेकीत पदक जिंकणारी किरण ही पहिली भारतीय महिला ठरली. १९५१ मध्ये वेबस्टर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते आणि त्या मुंबईतील होत्या. गोळाफेकीतील पदकासाठी भारताला ७२ वर्ष वाट पाहावी लागली. २४ वर्षीय किरणची ही पहिलीत परदेशातील सीनियर स्तरावरील स्पर्धा आहे.
1⃣st🏅 in #Athletics for 🇮🇳 at #AsianGames2022
— SAI Media (@Media_SAI) September 29, 2023
Bronze🥉 triumph for Kiran Baliyan & our hearts swell with pride 🤗
Kiran delivered a mighty throw of 17.36 in her 3⃣rd attempt during the Women's Shot Put Final Event to seize this achievement!
Let's keep those medals rolling in!… pic.twitter.com/riOLozUVLz
किरणचे वडील सतीश बालियान पीएसीमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. सध्या ते मेरठमध्ये कामाला आहेत. किरण रोज सकाळी आणि संध्याकाळी तिची आई बॉबीसोबत स्टेडियममध्ये सराव करते. मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असल्याने त्या तिच्या प्रशिक्षक बनल्या. आई बॉबी यांनी सांगितले होते की, मुलींची सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे. या युगात कोणावरही विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे मी दररोज किरणसोबत स्कूटरवर स्टेडियममध्ये येते. मी सकाळी 6.15 ते 8 या वेळेत स्टेडियममध्ये असते. यानंतर मी पुन्हा संध्याकाळी 4 ते 6:30 पर्यंत सराव करते. उरलेल्या वेळेत मी घरची कामं करते, माझ्या मुलीला खायला घालते, हे सगळं.
BRONZE
Kiran Baliyan wins bronze, first athletics medal, in women’s shot put at #Hangzhou#AsianGames2022@Adille1pic.twitter.com/A75mgYKsGA— Athletics Federation of India (@afiindia) September 29, 2023