११ ऑगस्ट अन् भारताच्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलचं कनेक्शन; अभिनव बिंद्रा, भारतीय पुरुष हॉकी संघानं रचलाय इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 03:59 PM2021-08-11T15:59:24+5:302021-08-11T16:03:19+5:30
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये हा सुवर्णक्षण पाहण्यासाठी भारतीयांना ७ ऑगस्ट २०२१ची वाट पाहावी लागली. भालाफेकपटू नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. आज सोशल मीडियावर देशाचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा ट्रेंड होत आहे. ११ ऑगस्ट अन् भारताचे ऑलिम्पिक गोल्ड मेडल कनेक्शन हे फक्त अभिनव बिंद्राच्या पदकापुरतेच नाही, तर फार जूने आहे..
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. #AbhinavBindra#Olympicspic.twitter.com/Q2GEba2YJA
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
चला जाणून घेऊया ११ ऑगस्ट अन् गोल्ड मेडल कनेक्शन...
भारतान आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत १० सुवर्णपदकं जिंकली आहेत. यातील दोन पदकं ही ११ ऑगस्ट या तारखेला जिंकता आलेली आहेत. २००८मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनवनं सुवर्णपदक जिंकले, त्याआधी १९३२मध्ये लॉस अँजिलिस येथे भारतीय पुरुष हॉकी संघानं मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचा २४-१ असा धुव्वा उडवून ऑलिम्पिकमधील सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले होते.
१९३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ध्यानचंद यांच्याकडे पहिल्यांदा भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. या स्पर्धेत फक्त तीन संग सहभागी झाले होते आणि भारतानं पहिल्या सामन्यात ११-१ असा विजय मिळवला होता आणि अमेरिकेला पराभूत केले. भारतानं दोन सामन्यांत ३५ गोल्स केले. भारतानं अमेरिकेवर २३ गोल्सच्या फरकानं मिळवलेला विजय हा ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात ध्यानचंद यांनी ८ गोल्स आणि रुप सिंग यांनी १० गोल्स केले होते. भारताचे हे ऑलिम्पिकमधील सलग दुसरे सुवर्णपदक होते. भारतीय पुरूष हॉकी संघानं आठ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. १९८०नंतर भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिक पदकासाठी ४१ वर्ष प्रतीक्षा पाहावी लागली.
२००८मध्ये बिंद्रानं १० मीटर एअर रायफल स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. त्यानंतर टोकियोत नीरज चोप्रानं हा पराक्रम करून दाखवला.