ऑसी
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30
फिंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थ
Next
फ ंच व मार्शची चमकदार कामगिरी, फिनची हॅट्ट्रिक व्यर्थऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलेमेलबोर्न : सलामीवीर ॲरोन फिंचने स्पर्धेतील पहिले शतक झळकावल्यानंतर मिशेल मार्शच्या (५ बळी) अचूक मार्याच्या जोरावर यजमान ऑस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा १११ धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडतर्फे हॅट्ट्रिक नोंदविणारा स्टीव्हन फिन व नाबाद ९८ धावांची खेळी करणारा जेम्स टेलर यांचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले. फिंच (१३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (६६ धावा, ४० चेंडू) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ९ बाद ३४२ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने अखेरच्या ३ चेंडूंवर ३ बळी घेत २०१५च्या विश्वकप स्पर्धेत पहिली हॅट्ट्रिक नोंदविली; पण तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा डाव ४१.५ षटकांत २३१ धावांत संपुष्टात आला. जेम्स टेलरने नाबाद ९८ धावांची खेळी केली; पण त्याला दुसर्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणार्या ऑस्ट्रेलियातर्फे मार्शने ९ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर मिशेल स्टार्क व मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ इंग्लंडची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर टेलर व ख्रिस व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून डाव सावरला; पण आवश्यक धावगती राखण्यात त्यांना अपयश आले. त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ऑस्ट्रेलियातर्फे फिंचने १२८ चेंडूंना सामोरे जाताना १३५ धावांची खेळी केली. त्यानंतर मॅक्सवेलच्या आक्रमक खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला मेलबोर्न क्रिकेट मैदानावर विशाल धावसंख्या उभारण्यात यश आले. ०००