ऑस्ट्रेलिया एकादश 219 धावांत गारद
By admin | Published: November 25, 2014 01:03 AM2014-11-25T01:03:16+5:302014-11-25T01:03:16+5:30
ऑस्ट्रेलिया दौ:यातील सराव सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळला़ प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने 16 षटकांत 1 बाद 55 धावांर्पयत मजल मारली होती़
Next
दोन दिवसीय सराव सामना :
वरुण अॅरोनचे 3 बळी, भारत 1 बाद 55
एडिलेड : वरून अॅरोनसह (73 धावांत 3 बळी) अन्य भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौ:यातील सराव सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाचा पहिला डाव 219 धावांत गुंडाळला़ प्रत्युत्तरात दिवसअखेर भारताने 16 षटकांत 1 बाद 55 धावांर्पयत मजल मारली होती़
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा मुरली विजय 32 आणि चेतेश्वर पुजारा 13 धावांवर खेळत होता़ मात्र, भारताचा शिखर धवन मोठी खेळी करू शकला नाही़ तो 1क् धावा काढून बाद झाला़
त्याआधी ऑस्ट्रेलिया एकादश संघाने नाणोफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला़ हा संघ भारतीय गोलंदाजांसमोर 71़5 षटकांत 219 धावांत ढेर झाला़ सध्या प्रतिस्पर्धी संघाच्या स्कोअरपासून भारतीय संघ 164 धावांनी पिछाडीवर आह़े त्यांचे अद्याप 9 गडी शिल्लक आहेत़
भारताकडून वरुण अॅरोन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला़ त्याने 72 धावांत 3 गडय़ांना तंबूचा रस्ता दाखविला़ तर भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविल़े तर ऑफस्पिनर आऱ आश्विन याने 1 विकेट घेतली़ ऑस्ट्रेलियातील उसळी घेणा:या खेळपट्टीवर फलंदाज भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे जाणकारांचे म्हणणो आह़े मात्र, सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आल़े
भारताच्या पहिल्या डावात मुरलीने सलामीला फलंदाजी करताना आपल्या खेळीत 5क् चेंडूंचा सामना करताना 4 चौकार लगावल़े तर पुजारा याने 26 चेंडूंना सामोरे जाताना 4 चौकार लगावल़े या दोन्ही खेळाडूंनी दुस:या गडय़ासाठी आतार्पयत 34 धावांची भागीदारी रचली आह़े
संक्षिप्त धावफलक
क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन : 71़5 षटकांत सर्वबाद 219़ (रियान कार्टर, 58, एशटोन टर्नर 29, केल्विन स्मिथ 4क्, जोश लालोर 18, हॅरी निल्सन नाबाद 43़ भुवनेश्वर कुमार 2/32, मोहंमद शमी 2/52, वरुण अॅरोन 3/72, कर्ण शर्मा 2/3क्,आऱ आश्विन 1/22)़ भारत : 16 षटकांत 1 बाद 55़ (मुरली विजय नाबाद 32, शिखर धवन 1क्, चेतेश्वर पुजारा नाबाद 13़ जोश लालोर 1/21)़