चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आॅस्ट्रेलिया, बांगलादेश संघ जाहीर
By admin | Published: April 20, 2017 08:37 PM2017-04-20T20:37:50+5:302017-04-20T20:37:50+5:30
आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपापले संघ जाहीर केले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन इंग्लंडमध्ये १ जूनपासून होत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबोर्न/ढाका: आॅस्ट्रेलिया आणि बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपापले संघ जाहीर केले. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन इंग्लंडमध्ये १ जूनपासून होत आहे. आॅस्ट्रेलियाने संघात मिशेल स्टार्क, जेम्स पॅटिन्सन, जोश हेजलवूड आणि पॅरूट कमिन्स या चार वेगवान गोलंदाजांना स्थान दिले असून अष्टपैलू जेम्स फॉल्कनरला डच्चू दिला. आक्रमक फलंदाज ख्रिस लीन याला संघात स्थान मिळाले. बांगलादेशने वेगवान शफिऊल इस्लामला स्थान दिले आहे. तो आॅक्टोबरमध्ये राष्ट्रीय संघासाठी अखेरचा सामना खेळला होता. भारतात २००६ मध्ये खेळल्यानंतर ११ वर्षांनी बांगला देशला चॅम्पियन्समध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. आॅस्ट्रेलिया इंग्लंड, बांगला देश, आणि न्यूझीलंड यांचा अ गटात समावेश आहे.
आॅस्ट्रेलिया संघ-
स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, अॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, ख्रिस
लीन, ग्लेन मॅक्सवेल, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, अॅडम झम्पा.
बांगलादेश संघ-
मशरफी मूर्तझा (कर्णधार), तमिम इक्बाल, इमरुल कायेस, सौम्या सररकार, शकिबुल हसन, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, सब्बीर रहमान, मोसादेक हुसैन, संजामुल इस्लाम, मुस्तफिझूर रहमान, तास्किन अहमद, रुबेल हुसेन, मेहदी हसन आणि शफिऊल इस्लाम.