अटतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाची बांगलादेशवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 10:56 PM2016-03-21T22:56:53+5:302016-03-21T22:56:53+5:30
स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कारा अथवा मराच्या लढतीत अॅडम झांपाच्या ३ विकेट आणि उस्मान ख्वाजाच्या धडाकेबाज ५८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला
Next
ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २१ - स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी कारा अथवा मराच्या लढतीत अॅडम झांपाच्या ३ विकेट आणि उस्मान ख्वाजाच्या धडाकेबाज ५८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला. स्पर्धेच्या सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला ३ विकेटने मात देत आयसीसी टी-२० स्पर्धेत आपले आव्हान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने मेहमुद्दलाच्या धडाकेबाज ४९ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात पाच बाद १५६ धावापर्यंत माजल मारत आस्ट्रेलियाला विजयासाठी १५७ धावांचे अव्हान दिले होते. आस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाच्या ५८ धावांच्या बळावर बांगलादेशचा ३ विकेटने पराभव केला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ३ फलंदाजाना बाद केले.
दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला १५७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात बांगलादेशने २० षटकात पाच बाद १५६ धावा केल्या. बांगलादेशचा फलंदाज महमुदुल्लाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने २९ चेंडूत एक षटकार आणि सात चौकार लगावत नाबाद ४९ धावा केल्या. तर मोहम्मद मिथुनने २२ चेंडूत २३ धावा केल्या. सौम्या सरकार अवघ्या शून धावेवर बाद झाला. त्याला गोलंदाज वॅटसनने झेलबाद केले. सब्बीर रेहमान १२ धावांवर बाद झाला, तर शकीब हसन ३३ आणि मुशफिकर रहिमने नाबाद १५ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाज वॅटसनने ४ षटकात ३१ धावा देत दोन बऴी टिपले, तर अॅडम झांपाने तीन बळी घेतले.