आॅस्ट्रेलियाचा संघ बनला चॅम्पियन

By admin | Published: July 7, 2015 12:39 AM2015-07-07T00:39:01+5:302015-07-07T00:39:01+5:30

ख्रिस सिरियलोच्या गोलच्या बळावर वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमचा १-० असा पराभव करताना वर्ल्ड लीग सेमीफायनलचे विजेतेपद पटकावले.

Australia become champion | आॅस्ट्रेलियाचा संघ बनला चॅम्पियन

आॅस्ट्रेलियाचा संघ बनला चॅम्पियन

Next

एंटवर्प : ख्रिस सिरियलोच्या गोलच्या बळावर वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने यजमान बेल्जियमचा १-० असा पराभव करताना वर्ल्ड लीग सेमीफायनलचे विजेतेपद पटकावले. अंतिम क्षणी ख्रिसने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना यजमानांचे स्वप्न भंग केले.
आॅस्ट्रेलियाला या रोमहर्षक सामन्याच्या अंतिम २५ सेकंदांत सलग २ सलग पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि अखेर ख्रिसने बेल्जियमच्या गोलरक्षकाला चकवताना गोल केला. हा गोल यजमान संघासाठी स्वप्न भंग करण्यासारखा होता. विशेषत: बेल्जियमचा गोलरक्षक जेरेमी गमसोफ्फ याच्यासाठी. त्याने पूर्ण सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकर्सला गोल करण्यापासून वंचित ठेवले होते. जागतिक क्रमवारीतील नंबर वन आॅस्ट्रेलियाने उत्तरार्धात अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले; परंतु
प्रत्येक वेळी बेल्जियमच्या गोलरक्षकाने बचाव केला; परंतु अखेरच्या मिनिटाला झालेल्या गोलमुळे बेल्जियमचे खेळाडू व प्रेक्षकही निराश झाले. आॅस्ट्रेलियाच्या मजबूत बचावफळीने बेल्जियमच्या स्ट्रायकर्सला गोल करण्याची संधीच मिळू दिली नाही. त्याआधी ब्रिटनने तिसऱ्या स्थानाच्या प्लेआॅफ लढतीत भारताचा ५-१ असा पराभव करीत कांस्यपदक जिंकले.
या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या चारही संघांनी रियो आॅलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले.(वृत्तसंस्था)

Web Title: Australia become champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.