३२६ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड
By admin | Published: December 29, 2014 09:24 AM2014-12-29T09:24:13+5:302014-12-29T15:44:01+5:30
तिस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे.
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - मेलबर्न येथे सुरु असलेल्या तिस-या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने ७ गडी गमावत २६१ धावा केल्या असून भारतावर ३२६ धावांची आघाडी घेतली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - ० अशी आघाडी असून हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल किंवा अनिर्णित राखेल आणि मालिका जिंकेल असे दिसत आहे. भारताचा पहिला डाव ४६५ डावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने झुंजार अर्धशतकी खेळी केली आणि कांगारूंचा डाव सावरला. याआधी पाठलाग करून चौथ्या डावात सामना जिंकण्याचा मेलबर्नवरचा विक्रम इंग्लंडने केला होता, ज्यावेळी त्यांनी ३३२ धावा केल्या होत्या. भारत हा सामना जिंकला तर नवा विक्रम करूनच. अर्थात तशी शक्यता कमी असून पाचव्या व शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी व नंतर फलंदाजांनी चमत्कार केला तरच भारताला हा सामना जिंकणे शक्य होणार आहे.
त्याआधी चौथ्या दिवशी सकाळी ८ बाद ४६२ वरुन पुढे खेळताना भारताच्या धावसंख्येत फक्त तीन धावांची भर पडली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी मोहम्मद शमी आणि उमेश यादव या दोघांना झटपट बाद केल्याने भारताचा डाव ४६५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियातर्फे रेयॉन हॅरिसने ४, मिचेल जॉन्सनने ३ आणि लियोनने दोन विकेट घेतल्या. तर वॉटसनने एक विकेट घेतली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडे ६० धावांची आघाडी होती. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवारांनी संघाला चांगली सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची सामन्यावरील पकड मजबूत केली. पाऊस आणि खराब हवामानामुळे चौथ्या दिवसातील सुमारे दीड तास वाया गेला. दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने आत्तापर्यंत २ गडी गमावत ९८ धावा केल्या आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाकडे १६३ धावांची आघाडी आहे.