ऑस्ट्रेलियाचे भारताला १६१ धावांचे आव्हान
By admin | Published: March 27, 2016 06:54 PM2016-03-27T18:54:02+5:302016-03-27T21:00:50+5:30
टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या.
Next
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २७ - टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या.
फलंदाज आरोन फिंचने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला. त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले.
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतीय संघासाठी 'करो या मरो' असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील मोहालीच्या मैदानावर हा सामना होत आहे.
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताला पाकिस्तान विरुद्धचा सामना वगळता एकाही सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शेवटच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने रडतखडत विजय मिळवला होता. हा सामना गमावला असता तर, भारतावर आजच्या सामन्यात सरस धावगती राखून विजय मिळवण्याचे दडपण वाढले असते.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने तीन सामने जिंकून क्लीनस्वीप विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना लौकीकाला साजेशी कामगिरी केली तरच, भारतासाठी उपांत्यफेरीचे दरवाजे उघडू शकतात. भारतासाठी दिलाशाची बाब म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० च्या बारा सामन्यात भारताने आठ विजय मिळवले आहेत.