गुलाबी चेंडूने खेळण्यास आॅस्ट्रेलिया सज्ज

By admin | Published: October 29, 2015 10:29 PM2015-10-29T22:29:16+5:302015-10-29T22:29:16+5:30

पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट कसोटी मालिकेत गुलाबी चेंडूचा वापर होणार असल्याने आमचे खेळाडू काहीसे चिंतेत आहेतच

Australia ready to play with pink balls | गुलाबी चेंडूने खेळण्यास आॅस्ट्रेलिया सज्ज

गुलाबी चेंडूने खेळण्यास आॅस्ट्रेलिया सज्ज

Next

अ‍ॅडलेड : पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट कसोटी मालिकेत गुलाबी चेंडूचा वापर होणार असल्याने आमचे खेळाडू काहीसे चिंतेत आहेतच, पण आम्ही खेळण्यास सज्ज असल्याचे सीएने स्पष्ट केले.
सीएने गुलाबी चेंडूचा वापर करावा, अशी विनंती काही खेळाडूंनी केली होती. आयोजकांनी मात्र त्यांची मागणी धुडकावून लावली. सीएच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की,‘गुलाबी चेंडूच्या वापराने दिवस-रात्रीची कसोटी खेळविण्याची आम्हाला आशा आहे. गुलाबी चेंडू निर्मात्या कंपनीने सात वर्षांपासून या संदर्भात प्रयोगही केले. क्रिकेटच्या काही यशस्वी सामन्यात आम्ही गुलाबी चेंडू वापरलेदेखील. डे-नाईट कसोटी सामना पूर्णपणे क्रिकेटच्या चाहत्यांना समर्पित असेल. अधिकाधिक लोकांनी कसोटी सामना टीव्हीवर पाहावा, यासाठीच हा सामना डे-नाईट करण्याची शक्कल आम्ही लढविली.’
गुलाबी चेंडूची निर्मिती करणाऱ्या कुकाबुरा कंपनीच्या मते चेंडूची निर्मिती अशाप्रकारे करण्यात आली की, रात्रीच्या उजेडात हा चेंडू जुन्या झालेल्या लाल चेंडूसारखाच दिसेल. क्रिकेटमधील या बदलाला काही खेळाडूंचा कडाडून विरोध आहे. आॅस्ट्रेलियाचा फलंदाज अ‍ॅडम व्होग्स म्हणतो,‘अलीकडे कॅनबेरा येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळविण्यात आलेल्या सामन्यादरम्यान गुलाबी चेंडूमुळे मला अधिक फरक जाणवला नाही. कसोटी क्रिकेटसाठी तिकिटांची विक्री वाढली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Australia ready to play with pink balls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.