आॅस्ट्रेलिया अव्वलस्थानी
By admin | Published: November 24, 2014 02:41 AM2014-11-24T02:41:49+5:302014-11-24T02:41:49+5:30
आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या (१०७) शतकाच्या बळावर निर्धारित षटकांत ६ बाद २८० धावा केल्या होत्या
Next
सिडनी : अॅरोन फिंच (७६), शेन वॉटसन (८२), स्टिव्हन स्मिथ (६७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर आॅस्ट्रेलियाने पाचव्या आणि अखेरच्या वन-डेत दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार दोन विकेटस्नी मात केली़ या विजयासह आॅस्ट्रेलियाने ही मालिका ४-१ अशी खिशात घातली आहे़ त्याचबरोबर हा संघ जागतिक वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे़
आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या (१०७) शतकाच्या बळावर निर्धारित षटकांत ६ बाद २८० धावा केल्या होत्या; मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आॅस्ट्रेलियाला ४८ षटकांत २७५ धावांचे लक्ष्य मिळाले होते़ त्यांनी हे लक्ष्य ४७ षटकांत ८ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़ (वृत्तसंस्था)