वेस्ट इंडिजवर मात करत आॅस्ट्रेलिया अजिंक्य
By admin | Published: June 27, 2016 05:32 PM2016-06-27T17:32:13+5:302016-06-27T17:32:13+5:30
यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वॅडच्या (नाबाद ५७) नाबाद अर्धशतकी खेळीनंतर जोश हेजलवुड (५-५०) व मिशेल मार्श (३-३२) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने सोमवारी
Next
ऑनलाइन लोकमत
बारबाडोस, दि. २७ - यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वॅडच्या (नाबाद ५७) नाबाद अर्धशतकी खेळीनंतर जोश हेजलवुड (५-५०) व मिशेल मार्श (३-३२) यांच्या अचूक मा-याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने सोमवारी अंतिम लढतीत वेस्ट इंडिजचा ५८ धावांनी पराभव केला आणि तीन देशांचा समावेश असलेल्या तिरंगी क्रिकेट मालिकेत जेतेपदाचा मान मिळवला.
आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ९ बाद २७० धावांची आव्हानात्मक मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाºया वेस्ट इंडिज संघाचा डाव ४५.४ षटकांत २१२ धावांत गुंडळाला. वॅडने चमकदार कामगिरी करताना ५२ चेंडूंमध्ये २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी केली.
बारबाडोसच्या केन्सिग्टन ओव्हल मैदानावर २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान विंडीज संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर जॉन्सन चार्ल्सने संघातर्फे सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. त्यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश आहे.
दिनेश रामदिनने ६७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ४० धावा केल्या. कर्णधार जेसन होल्डर (३४ धावा, ३७ चेंडू, ३ चौकार व १ षटकार) व सुनील नारायण (२३ धावा, १८ चेंडू, ४ चौकार) यांचे प्रयत्न अपुरेच पडले. किरोन पोलार्डने २० तर कार्लोस ब्रेथवेटने १४ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियातर्फे हेजलवुडने ९.४ षटकांत ५० धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेतले. मार्शने ३२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. नॅथन कोल्टर नाईल व अॅडम जम्पा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाºया आॅस्ट्रेलिया संघाने ९ बाद २७० धावांची आव्हानात्मक मजल मारली. सलामीवीर फिंचने ४७ आणि कर्णधार स्टिव्हन स्मिथने ४६ धावांची खेळी केली. मॅथ्यू वॅडने नाबाद ५७ धावा फटकावल्या. फिंचच्या खेळीत ६ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे तर स्मिथने ५९ चेंडूंना सामोरे जाताना चार चौकार ठोकले. मिशेल मार्शने गोलंदाजीमध्ये छाप सोडण्यापूर्वी ४५ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या साहायाने ३२ धावांची खेळी केली. जॉर्ज बेली (२२) व मिशेल स्टार्क (१७) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. बेली व स्मिथ यांनी ११.४ षटकांत तिसºया विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. या लढतीतील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.
विंडीजतर्फे होल्डरने १० षटकांत ५१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले तर शैनन गेब्रियलने ७ षटकांत ५८ धावा बहाल करताना २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवली. किरोन पोलार्ड, सुनील नारायण आणि सुलेमान बेन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.