ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 07:20 PM2016-03-21T19:20:46+5:302016-03-21T19:25:08+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामी लढतीत
Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २१ - टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामी लढतीत न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारणारा ऑस्ट्रेलिया आणि पाकविरुद्ध पराभवाला सामोरे जाणारा बांगलादेश या दोन्ही संघांपुढे आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये आव्हान कायम राखण्याचे लक्ष्य आहे.
उभय संघांदरम्यान आजच्या या सामन्यात खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळणार आहे. ही लढत उभय संघांसाठी ‘करा अथवा मरा’ अशी आहे. या लढतीत पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळजवळ संपुष्टात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण डेव्हिड वॉर्नर व स्टिव्ह स्मिथ यांच्यासह आघाडीच्या खेळाडूंना गेल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाची फलंदाजीची बाजू मजबूत असून, सोमवारच्या लढतीत आघाडीच्या फळीकडून त्यांना चमकदार कामगिरीची आशा आहे.