आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले

By admin | Published: September 5, 2016 05:52 AM2016-09-05T05:52:52+5:302016-09-05T05:52:52+5:30

वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आज पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले.

Australia wrapped up Sri Lanka's first innings total of 195 runs | आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले

आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले

Next


पल्लेकल : वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने आज पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेला १९५ धावांत गुंडाळले.
श्रीलंकेचा कार्यवाहक कर्णधार दिनेश चांदीमल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. धनुष्का गुणतिलक (३९) आणि धनंजय डिसिल्वा (३४) यांनी सलामीसाठी ७३ धावांची भागीदारी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली; परंतु त्यानंतर श्रीलंकेची फलंदाजी ढेपाळली व त्यांचा संघ ४0.२ षटकांत गारद झाला.
श्रीलंकेने सलग षटकात चार धावांच्या अंतरात डिसिल्वा आणि गुणतिलक याशिवाय चांदीमल यांना गमावले. त्यामुळे त्यांची स्थिती ३ बाद ७७ अशी झाली. कुशल मेंडीस (३३) व उपुल थरंगा (१५) यांनी चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी केली; परंतु ही भागीदारी तुटताच पुन्हा लंकेची फलंदाजी ढेपाळली. कुशल परेरा (१४) आणि दासून शनाका (१३) हे दुहेरी आकडी धावा काढू शकले; परंतु मोठी खेळी करू शकले नाहीत. तळातील फलंदाज सचित पातिराना याने अखेरच्या फलंदजाच्या रूपात बाद होण्याआधी ३२ धावांची खेळी केली. आॅस्ट्रेलियाकडून स्टार्कने ४0 धावांत ३ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (१२.४ षटकांत)
सर्वबाद १९५.
(धनुष्का गुणतिलक ३९, धनंजय डिसिल्वा ३४, कुशल मेंडीस ३३, पातिराना ३२. मिचेल स्टार्क ३/४0, अ‍ॅडम जम्पा २/४३, हेड २/२२).

Web Title: Australia wrapped up Sri Lanka's first innings total of 195 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.