अजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 10:55 PM2021-07-29T22:55:08+5:302021-07-29T22:57:24+5:30

Tokyo Olympics : जेसिका फॉक्सने आपली कायक बोट ठीक करण्यासाठी कंडोम वापरल्याचा दावा केला आहे. 

australian canoe slalom athelete jessica fox revealed how by using condom wins bronze at tokyo olympics | अजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक!

अजब, पण खरं आहे; ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूनं कंडोमच्या मदतीनं जिंकलं ऑलिम्पिक पदक!

Next

Tokyo Olympics : स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची केनो स्लॅलम महिला खेळाडू जेसिका फॉक्सने (Jessica Fox) टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) सी -1 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. या व्यतिरिक्त तिने के -1 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. दरम्यान, जेसिका फॉक्सने आपली कायक बोट ठीक करण्यासाठी कंडोम वापरल्याचा दावा केला आहे. 

लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती जेसिका फॉक्सने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ क्लिपही शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की तिच्या क्रूमधील  एक सदस्य बोट दुरुस्त करण्यासाठी कंडोमचा वापर करत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, जेसिका फॉक्सच्या क्रूचा एक सदस्य तिच्या बोटची दुरुस्ती करण्याच्या प्रयत्नांमध्ये व्यस्त आहे. 

दरम्यान, तो बोट ठिक करण्यासाठी कंडोम वापरतानाही दिसतो. जेसिका फॉक्सने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, "तुम्हा लोकांना कदाचित हे माहीत नसेल की कंडोमच्या सहाय्याने कश्तीची बोट सुद्धा दुरुस्त केली जाऊ शकते, असे मला वाटते." फ्रान्समध्ये जन्मलेली जेसिका फॉक्सची गिनती दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत 10 वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. 

जेसिका फॉक्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे जेसिका फॉक्सचे आई-वडील रिचर्ड आणि मरियम यांनीही ऑलिम्पिकच्या केनो स्पर्धेत भाग घेतला होता. तिचे वडील रिचर्ड हे पाच वेळा चॅम्पियन आहेत आणि ऑस्ट्रेलिया केनोचे ते सध्या हाय-परफॉर्मेंस मॅनेजरची जबाबदारी सांभाळत आहेत.

condom kayak

Web Title: australian canoe slalom athelete jessica fox revealed how by using condom wins bronze at tokyo olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.