ऑस्ट्रेलियन ओपन - शारापोव्हाला नमवून सेरेनाची सेमी फायनलमध्ये धडक

By admin | Published: January 26, 2016 09:14 AM2016-01-26T09:14:36+5:302016-01-26T09:19:51+5:30

टेनिस जगाची सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाला नमवून ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली

Australian Open - Sharapova clash in semifinals semi-final | ऑस्ट्रेलियन ओपन - शारापोव्हाला नमवून सेरेनाची सेमी फायनलमध्ये धडक

ऑस्ट्रेलियन ओपन - शारापोव्हाला नमवून सेरेनाची सेमी फायनलमध्ये धडक

Next
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २६ - टेनिस जगाची सम्राज्ञी सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाला नमवून ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेनाने मारियाचा ६-४, ६-१ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत सामना जिंकला. या विजयामुळे सेरेना सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे.
'मारिया ही अत्यंत फोकस्ड खेळाडू असून तिने आत्तापर्यंत कित्येकवेळेस उत्तम खेळ करत अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. आजच्या विजयासाठी मलाही खूप मेहनत करावी लागली' अशा शब्दांत सेरेनाने तिची प्रतिस्पर्धी मारियाचे कौतुक केले.
 
दरम्यान  सेरेना- मारिया या दोघी एकमेकांविरोधात २१ वेळा खेळल्या असून त्यात सेरेनाने १९ तर मारियाने अवघे २ सामने जिंकले आहेत.

Web Title: Australian Open - Sharapova clash in semifinals semi-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.