लंकेविरुद्ध आॅस्ट्रेलियाची फिरकीपटूंना पसंती
By admin | Published: July 25, 2016 08:10 PM2016-07-25T20:10:08+5:302016-07-25T20:10:08+5:30
श्रीलंकेविरुद्ध आज मंगळवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्याकसोटीसाठी आॅस्ट्रेलिया संघाने अंतिम एकादशमध्ये दोन फिरकी गोलंदाजांना स्थान दिले
ऑनलाइन लोकमत
पाल्लेकल, दि २५ : श्रीलंकेविरुद्ध आज मंगळवारपासून सुरू होत असलेल्या पहिल्याकसोटीसाठी आॅस्ट्रेलिया संघाने अंतिम एकादशमध्ये दोन फिरकी गोलंदाजांना स्थान दिले. नाथन लियॉन आणि स्टीव्ह ओकिफे यांचा संघात समावेश करण्यात
आला आहे.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने कसोटी विश्वात पुन्हा नंबर वन होता यावे यासाठी दोन फिरकी गोलंदाज संघात ठेवण्याचा निर्णय घेतला. ओकिफे याने सराव सामन्यात दहा गडी बाद केले होते. तो कारकिर्दीत तिसरा कसोटी सामना खेळेल.
पाल्लेकलच्या खेळपट्टीला भेगा पडलेल्या दिसत आहेत.
यामुळे लंकेचा फिरकी गोलंदाज रंगना हेरथ याला लाभ होण्याची शक्यता लक्षात घेत पाहुण्या संघाने देखील दोन स्पिनर खेळविण्याचा निर्णय घेतला. लंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज याने अद्याप अंतिम ११ खेळाडू जाहीर केले नाहीत. वेगवान गोलंदाज सुरंगा लकमलच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आहेत. व्यायाम करतेवेळी धनंजय डिसिल्व्हा हा देखील जखमी झाला आहे.