ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावात आटोपला
By Admin | Published: March 25, 2017 09:02 AM2017-03-25T09:02:27+5:302017-03-25T19:31:20+5:30
पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 25 - पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने प्रभावी मारा करत ऑस्ट्रेलियाला चार धक्के दिले. अन्य गोलंदाजांनीही आपली भूमिका चोख बजावल्याने भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने (111) कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवत शतक झळकावले. त्याची आणि मॅथ्यू वेडची (57) अर्धशतकी खेळी वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. डेव्हीड वॉर्नर, मॅक्सवेल, हँडस्काँब, कमिन्सचे महत्त्वाचे विकेट यादवला मिळाले. उमेश यादव दोन तर, अश्विन, जाडेजा, भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी एक विकेट घेतला.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. रेनशॉच्या रुपाने 10 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का लवकर बसला. अवघ्या 1 धावावर उमेश यादवच्या रेनशॉच्या यष्टया वाकवल्या. पण त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (56) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी134 धावांची भागीदारी केली.
हे दोघे फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र होते. पण स्मिथ आणि वॉर्नरची जमलेली जोडी कसोटी पदार्पण करणा-या कुलदीप यादवने फोडली. त्याने वॉर्नरला (56) धावांवर कर्णधार रहाणेकडे झले द्यायला भाग पाडले. वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. मार्श (4), हँडस्काँब (8)आणि मॅक्सवेल (8) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार स्मिथने एकबाजू लावून धरली मात्र तो 111 धावांवर आऊट झाला.
चार सामन्यांच्या मालिकेचा निकाल ठरविणा-या निर्णायक कसोटी सामन्याआधीच विराट कोहली खेळणार नसल्याने भारताला खूप मोठा धक्का बसला. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली खेळणार नसल्याने उप कर्णधार अजिंक्य रहाणेकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान विराट कोहलीऐवजी भारतीय संघात गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. या सामन्यातून कुलदीप यादव पदार्पण केले.
मैदानी आणि शाब्दिक चकमकीने गाजलेली ही मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत असली तरी मालिका जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आसुसला आहे. कर्णधार विराट कोहली खेळणार नसल्याने जिंकण्याचे दडपण पाहुण्यांच्या तुलनेत यजमानांवर अधिक जाणवणार आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येलाच कोहलीने आपण चौथा कसोटी सामना खेळणार नसल्याचे संकेत दिले होते. कोहलीने नेटवर सराव केला पण फिजिओ पॅट्रिक फरहार्ट हेच माझ्या खेळण्याचा निर्णय घेतील, असेही स्पष्ट केले होते. तथापि सामन्याआधी प्रतिस्पर्धी संघाला मानसिक बळ मिळू नये यासाठी विराट पत्रकारांपुढे देखील हजार झाला होता. नेटस्वर कसे वाटत होते असा सवाल करताना कोहली म्हणाला, ‘मुव्हमेंट वाढली की थोडे दुखणे उमळते. आज सायंकाळी किंवा उद्या सामन्याआधी निर्णय होईल. जोखीम पत्करणे धोकादायक ठरेल काय याचे उत्तर फिजिओ देतील. फिटनेसमध्ये पास झालो तर खेळेन’ असं विराट बोलला होता.
तिसरा सामना अनिर्णीत राखल्याने स्टीव्ह स्मिथ आणि सहकाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दुसरीकडे भारतही कसलीही कसर शिल्लक न राखता विजयाच्या इराद्यानेच उतरणार आहे.
लोकेश राहुलकडून चांगली सुरुवात अपेक्षित असून दोन महिन्यांआधी तिहेरी शतक ठोकणाऱ्या करुण नायरकडून मोठ्या अपेक्षा आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांच्याकडून शांतचित्त आणि कौशल्यपूर्ण फलंदाजी अपेक्षित असेल. कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेचे नेतृत्व पणाला लागलेले असेल. ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णीत राखला तरी त्यांचा नैतिक विजय होईल. सामना जिंकलाच तर त्यांच्यासाठी अॅशेसपेक्षा हा मोठा विजय ठरणार आहे.
हा संघ भारतात दाखल झाला तेव्हा आतापर्यंतचा सर्वांत कमकुवत संघ अशी गणना करण्यात आली. पण पहिलाच सामना जिंकल्याने चित्र बदलले.