पर्थमध्ये आॅस्ट्रेलियाचा खुर्दा

By admin | Published: November 8, 2016 03:48 AM2016-11-08T03:48:27+5:302016-11-08T03:48:27+5:30

वेगवान गोलंदाज कॅसिगो रबाडा याच्या पाच बळींमुळे दक्षिण आफ्रिकेने सोमवारी संपलेल्या पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाला मोसमातील पहिल्या

Australia's Khurda in Perth | पर्थमध्ये आॅस्ट्रेलियाचा खुर्दा

पर्थमध्ये आॅस्ट्रेलियाचा खुर्दा

Next

पर्थ : वेगवान गोलंदाज कॅसिगो रबाडा याच्या पाच बळींमुळे दक्षिण आफ्रिकेने सोमवारी संपलेल्या पहिल्या कसोटीत आॅस्ट्रेलियाला मोसमातील पहिल्या कसोटीत त्यांच्याच घरच्या मैदानावर तब्बल १७७ धावांनी नमविले. कसोटीतील आॅस्ट्रेलियाचा हा सलग चौथा पराभव होता.
५३९ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ३६१ धावांत संपुष्टात आला. १९८८ नंतर आॅस्ट्रेलियाने मोसमातील पहिला सामना गमाविला नव्हता; पण डेल स्टेन खांद्याच्या दुखण्यामुळे बाहेर होताच रबाडाने वेगवान माऱ्याची जबाबदारी स्वीकारीत आफ्रिकेला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. रबाडाने ९२ धावांत ५ गडी बाद केले. पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या फिरकीपटू केशव महाराज याने ९४ धावांत एक गडी टिपला. आॅस्ट्रेलियाच्या पीटर नेव्हिल याने सर्वाधिक नाबाद ६० धावा केल्या. स्टि स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलियाने जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यात तिन्ही कसोटी सामने गमाविले.
आॅस्ट्रेलियाने ४ बाद १६९ वरून खेळायला सुरुवात केली तेव्हा सामना अनिर्णीत राखायचा हेच टार्गेट होते. सामनावीर रबाडाने मात्र त्यांच्या आशा धुळीस मिळविल्या. स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे सहा महिने खेळापासून दूर राहील. रबाडाने त्याची उणीव भरून काढली. २१ वर्षांच्या या गोलंदाजाने चौथ्या दिवशी तीन आणि पाचव्या दिवशी दोन गडी बाद करीत यजमानांचे कंबरडे मोडले. नऊ कसोटीत चौथ्यांदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने केली. रबाडाने या वयात केलेला आफ्रिकेसाठी हा नवा विक्रम ठरला.
पाचव्या दिवशी रबाडाचा यॉर्कर मिशेल मार्शच्या (२६) पायावर आदळला. त्याने केलेले पायचितचे अपील पंच अलिम दार यांनी फेटाळले; पण तिसऱ्या पंचाने मार्शला बाद दिले. उस्मान ख्वाजासोबत (९७) स्टार्कची ५० धावांची भागीदारी झाली. अखेर रबाडानेच स्टार्कला पायचित करीत स्वत:चा पाचवा बळी घेतला. रविवारी त्याने शॉन मार्श (१५), स्मिथ (३४) आणि अ‍ॅडम बोगेस (१) यांना तंबूची वाट दाखविली.
दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात शतक ठोकणारा जेपी ड्यूमिनी याने ख्वाजाला बाद केले. डेव्हिड वॉर्नरला सुरेख धावबाद करणारा तेम्बा बावुमा यालादेखील गोलंदाजी देण्यात आली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर पहिला बळी मिळविला होता. ख्वाजाला त्याने पायचित केले होते; पण रिप्लेमध्ये बावुमाचा पाय रेषेबाहेर असल्याचे निष्पन्न होताच तो ‘नो बॉल’ ठरला. नंतर त्याने जोश हेजलवुड (२९) याला बाद केले.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात २४२ धावा केल्यानंतर बिनबाद १५८ अशी झकास सुरुवात करणाऱ्या आॅस्ट्रेलियाचा डाव २४४ धावांत गुंडाळला. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ८ बाद ५४० वर डाव घोषित करीत यजमान संघाला विजयासाठी ५३९ धावांचे आव्हान दिले होते. (वृत्तसंस्था)

धा व फ ल क
दक्षिण आफ्रिका पहिला डाव २४२. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २४४. दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ५४०/८ घोषित
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव - मार्श झे. डु प्लेसिस गो. रबाडा १५, वॉर्नर धावचित (बवुमा) ३५, ख्वाजा पायचित गो. ड्युमिनी ९७, स्मिथ झे. डी कॉक गो. रबाडा ३४, व्होग झे. डी. कॉक गो. रबाडा १, मार्श पायचित गो. रबाडा २६, नेव्हील नाबाद ६०, स्टार्क पायचित गो. रबाडा १३, सिडल पायचित गो. फिलिंडर १३, हॅझलवूड गो. इल्गर, गो. बवुमा २९, ल्योन पायचित गो. महाराज ८. अवांतर ३०, एकूण ११९ षटकांत सर्वबाद ३६१. गडी बाद क्रम : १-५२, २-५२, ३-१४४, ४-१४६, ५-१९६, ६-२४६, ७-२६२, ८-२८०, ९-३४५, १०-३६१. गोलंदाजी : रबाडा ३१-६-९२-५, फिलिंडर २२-७-५५-१, ड्युमिनी १७-१-५१-१, महाराज ४०.१-१०-९४-१, कुक २-०-१६-०, बवुमा ७-१-२९-१.

शेन वॉर्नने फोडले स्मिथवर खापर
दक्षिण आफ्रिकेकडून आॅस्ट्रेलियाच्या झालेल्या पराभवाबद्दल माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला जबाबदार धरले आहे. त्याच्या खराब कप्तानीमुळेच आॅस्ट्रेलियाला पराभवाचे तोंड पहावे लागले असे त्याने म्हटले आहे.
३७ डिग्री सेल्सीयस तापमानात जलदगती गोलंदाज मोठे मोठे स्पेल टाकून दमले होते, त्यांना बळीही मिळत नव्हते, अशावेळी फिरकी गोलंदाज नॅथन लियोनकडून जास्त गोलंदाजी करुन घेण्याची गरज होती. परंतु, त्याला केवळ १२ षटकेच गोलंदाजी देण्यात आली.
लियोनला पहिल्या सत्रात गोलंदाजी मिळाली नाही, अन्य गोलंदाजांचा पर्याय वापरुन झाल्यानंतर त्याच्याकडे चेंडू देण्यात आला, अशा गोष्टीमुळे त्याचा आत्मविश्वास ढळू शकतो

Web Title: Australia's Khurda in Perth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.