आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

By admin | Published: December 28, 2014 12:56 AM2014-12-28T00:56:30+5:302014-12-28T00:56:30+5:30

कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या.

Australia's Ramp | आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

Next

तिसरी कसोटी : स्मिथच्या १९२ धावांमुळे ५३० पर्यंत मजल; भारत १ बाद १०८ धावा
मेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या. त्याने १९२ धावांची खेळी करताच आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५३० पर्यंत मजल गाठली. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सुरेख खेळ केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुरली विजयच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर १ बाद १०८ अशी वाटचाल केली. भारत अद्याप ४२२ धावांनी मागे असून, विजय ५५ आणि चेतेश्वर पुजारा २५ धावांवर खेळत होते. शिखर धवन २८ धावा काढून बाद झाला. आॅस्ट्रेलियाने सकाळी ५ बाद २५९ वरून पुढे खेळ सुरू केला. स्मिथने सातव्या शतकासह १९२ धावा ठोकल्या. त्याने ब्रॅड हॅडिन(५५)सोबत सहाव्या गड्यासाठी ११० आणि रेयॉन हरिस(७४)सोबत आठव्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. तळाच्या फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. स्मिथ सात तास मैदानावर होता. त्याने ३०५ चेंडू खेळून १५ चौकार व २ षटकार हाणले. करियरमधील ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.
भारताकडून ईशांत शर्मा फ्लॉप ठरला. उमेश यादवने मात्र ३ गडी बाद केले. मोहम्मद शमी याने १३८ धावांत ४ गडी बाद केले. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला १३४ धावांत ३ गडी बाद करता आले. दुसऱ्या सत्रात स्मिथ- हॅरिस जोडीने वेगाने धावा काढल्या. अखेर अश्विनने धावांना आवर घालत हॅरिसला बाद केले. भारताच्या डावात हॅरिसने धवनला बाद केले. धवनने स्लिपमध्ये स्मिथकडे सोपा झेल दिला. मुरली आणि पुजारा यांनी त्यानंतर कुठलीही जोखीम न पत्करता सावध धावा काढल्या. भारताला मालिका बरोबरीत सोडवायची झाल्यास हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागेल. त्यासाठी मुरली-पुजारा यांना मोठी खेळावी करावी लागेल. यजमान संघ ज्या खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावा उभारतो, तेथे भारतीय फलंदाज धावा काढण्यात कुठवर बाजी मारतील, यावर भारताच्या विजयाचे समीकरण विसंबून असेल. (वृत्तसंस्था)

विजयचा विक्रम
मुरली विजय आॅस्ट्रेलियात मालिकेत तीनपेक्षा अधिक अर्धशतके नोंदविणारा पहिला भारतीय ओपनर बनला. त्याने माजी सलामीवीर सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत यांना मागे टाकले.गावस्करने १९७७ च्या दौऱ्यात तीन अर्धशतके ठोकली.श्रीकांतने ८६ च्या दौऱ्यात ही कामगिरी केली.

मोठी धावसंख्या उभारू
‘आम्ही प्रतिस्पर्धी फलंदाजांना लवकर गुंडाळू इच्छित होतो. पण स्टीव्हन स्मिथने समर्थ खेळी करीत आम्हाला बॅकफूटवर आणले. आम्ही अधिक धावा दिल्या हे खरे आहे, पण मोठी खेळी करू शकतो. खेळपट्टीवर नजर टाकल्यास या धावा अधिक नाहीत. खेळपट्टी मंद आणि पाटा झाली आहे. याचा लाभ घेत उद्या आम्ही चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करणार आहोत.’ - रविचंद्रन अश्विन

धोनीचा विक्रम
महेंद्रसिंग धोनीने शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात कारकीर्दीतील १३४ वी स्टंपिंग करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा नवा विक्रम नोंदविला.

धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. शमी ५७, डेव्हिड वॉर्नर झे. धवन गो. यादव ००, शेन वाटसन पायचित गो. अश्विन ५२, स्टीव्हन स्मिथ त्रि. गो. यादव १९२, शॉन मार्श झे. धोनी गो. शमी ३२, ज्यो बर्न्स झे. धोनी गो. यादव १३, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. शमी ५५, मिशेल जॉन्सन यष्टिचित धोनी गो. अश्विन २८, रेयॉन हॅरिस पायचित गो. अश्विन ७४, नाथन लियॉन त्रि. गो. शमी ११, ज्योश हेजलवुड नाबाद ००, अवांतर : १६, एकूण : १४२.३ षटकांत सर्वबाद ५३० धावा. गडी बाद क्रम: १/०, २/११५, ३/११५, ४/१८४, ५/२१६, ६/२३६, ७/३७६, ८/४८२, ९/५३०, १०/५३०. गोलंदाजी : शर्मा ३२-७-१९४-०, यादव ३२.३-३-१३०-३, शमी २९-४-१३८-४, अश्विन ४४-९-१३४-३, विजय ५-०-१४-०.
भारत पहिला डाव : मुरली विजय खेळत आहे ५५, शिखर धवन झे. स्मिथ गो. हॅरिस २८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे. २५, अवांतर ००, एकूण: ३७ षटकांत १ बाद १०८ धावा. गडी बाद क्रम: १/५५. गोलंदाजी: मिशेल जॉन्सन ९-३-२४-०, रॅन हॅरिस ७-३-१९-१, हेजलवुड ९-४-१९-०, वाटसन ४-०-१४-०, नॅथन लियॉन ८-०-३२-०.

 

Web Title: Australia's Ramp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.