स्मिथच्या शतकाने आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
By admin | Published: August 21, 2015 10:52 PM2015-08-21T22:52:18+5:302015-08-21T22:52:18+5:30
स्टीव्हन स्मिथचे दमदार शतक (१४३) आणि त्याने वोजेस (७६) सोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अॅशेस
ओव्हल : स्टीव्हन स्मिथचे दमदार शतक (१४३) आणि त्याने वोजेस (७६) सोबत चौथ्या विकेटसाठी केलेल्या १४६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर अॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८१ धावा केल्या. याला उत्तर देताना इंग्लंडने सावध सुरवात करुनही पन्नाशीच्या आत त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा इंग्लंडने २३.३ षटकांत ३ गडी गमावून ६० धावा केल्या होत्या. यावेळी रुट ६ धावांवर खेळत होता. तर अॅडम लीथ(१९), अॅलिस्टर कुक (२२) व इयान बेल (१०) तंबूत परतले होते.
कालच्या ३ बाद २८७ या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाकडून आज दिवस गाजविला तो संघाचा भावी
कर्णधार स्टिव्हन स्मिथने. त्याने
स्वत:चे शतक झळकावताना संघालाही मजबूत स्थितीत नेवून ठेवले. काल अर्धशतकापासून ३ धावांनी दूर असलेल्या वोजेसने
आपले अर्धशतक पूर्ण केले. उपहारापूर्वी स्मिथनेही आपले शतक पूर्ण केले. यासाठी त्याने १९७ चेंडू खेळले.
उपहाराला खेळ थांबला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ७ बाद ३७६ धावा झाल्या होत्या. तळाच्या फळीतील मिशेल स्टार्क याने अर्धशतकी खेळी करीत स्मिथ सोबत ९१ धावांची भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलियाला पाचशेच्या उंबरठ्यावर जाता आले. स्मिथ १४८ धावा करुन
आठव्या गड्याच्या रुपाने तर स्टार्क ५0 धावांवर नवव्या विकेटच्या रुपात
बाद झाला. (वृत्तसंस्था)