पाकच्या आॅलिम्पिक पथकात खेळाडूंपेक्षा अधिकारीच जास्त
By admin | Published: June 30, 2016 09:09 PM2016-06-30T21:09:32+5:302016-06-30T21:09:32+5:30
पाकिस्तानात खेळाची किती दुरवस्था आहे, याची झलक रिओ आॅलिम्पिकदरम्यान पाहायला मिळेल. आॅलिम्पिकसाठी जाहीर झालेल्या पथकात खेळाडू कमी आणि अधिकारीच जास्त आहेत.
कराची : पाकिस्तानात खेळाची किती दुरवस्था आहे, याची झलक रिओ आॅलिम्पिकदरम्यान पाहायला मिळेल. आॅलिम्पिकसाठी जाहीर झालेल्या पथकात खेळाडू कमी आणि अधिकारीच जास्त आहेत.
पाक हॉकी संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयशी ठरला. त्यामुळे पाकच्या आॅलिम्पिक पथकात ७ खेळाडू तसेच ११ अधिकारी राहणार आहेत. खेळाडूंमध्ये जलतरणपटू लियाना स्वान आणि हॅरिस बेंडी यांचा समावेश आहे.
दोघेही विदेशात वास्तव्यास आहेत. ज्युडोपटू शाह हुसेन टोकियोत वास्तव्यास आहेत. नेमबाज गुलाम मुस्तफा आणि मिनाल सोहेल यांच्यासह अन्य दोन धावपटू आहेत. कुठलाही खेळाडू पात्रता गाठू न शकल्याने पाकच्या सर्वच खेळाडूंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला.
हॉकीचा अपवाद वगळता पाकने आॅलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकली. बॉक्सिंगमध्ये हुसेन शाह याने १९८८ मध्ये कांस्य जिंकले होते. ज्युडोपटू शाह हुसेन त्यांचाच मुलगा आहे. पाक आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आरिफ हसन म्हणाले, हॉकी आमचा राष्ट्रीय खेळ आहे पण यंदा या खेळातही पात्रता गाठता आली नाही, याबद्दल खेद वाटतो.(वृत्तसंस्था)