खेळात ‘प्राधिकरणा’ला जागा नाही - राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:47 AM2017-11-25T03:47:51+5:302017-11-25T03:48:47+5:30
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल.
नवी दिल्ली : भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई)चे नाव बदलण्यात येणार आहे. साईचे पुनर्गठन करून त्याला अधिक व्यावसायिक बनवले जाईल. त्यात सरकारचे लक्ष्य २०२२पर्यंत कर्मचाºयांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत घटवण्याचे आहे. राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘साईतील प्राधिकरण हा शब्द बदलण्यात येणार आहे. कारण या क्षेत्रात त्याला जागा नाही. खेळ हा सेवेशी जोडला गेला आहे.’
सध्या साईच्या बजेटचा सर्वांत मोठा भाग खेळाशिवाय इतर कामांवर खर्च होत आहे. राठोड यांनी सांगितले की, केंद्र सरकार अशा कामांचे आऊटसोर्सिंग करेल, आणि सरकार क्रीडा प्रतिभेवर काम करणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती विकसित करण्याची सरकारची इच्छा आहे.’ त्यांनी सांगितले की, ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्यासाठी देशभरात अभियान राबवले जाणार आहे. त्यातून निवडल्या गेलेल्या खेळाडूंना शाळेतच क्रीडा आणि शिक्षण सुविधा पुरवल्या जाणार आहेत.’ तसेच, खेळांना सरकारकडून व्यावसायिक लोकांकडे हस्तांतरित करण्याचे काम करत असल्याचेही क्रीडामंत्री म्हणाले.
क्रीडामंत्र्यांनी पुढे सांगितले, ‘क्रीडामंत्रालय नोकºयांमध्ये खेळाडूंनाही कोटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नियमानुसार खेळाडूंना पाच टक्के आरक्षण दिले जात आहे.’ (वृत्तसंस्था)
>राठोड म्हणाले की, ‘आमची इच्छा आहे की, खेळाडूंसाठी विशेष कोटा निश्चित केला जावा. त्याने जर कोणतेही आॅलिम्पिक पदक पटकावले असेल तर त्याला ‘ग्रेड ए’च्या नोकरीत आरक्षण मिळायला हवे.’