Paris Paralympics 2024 : खूब लड़ी...! 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराचे पदक हुकले; पण तिनं मनं जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 08:11 PM2024-09-03T20:11:45+5:302024-09-03T20:18:26+5:30
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देखील गोल्डन कामगिरी करणाऱ्या अवनी लेखराला मंगळवारी मात्र पदक जिंकण्यात अपयश आले.
avani lekhara paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या पदकांचे खाते उघडणारी अवनी लेखरा... आपल्या सुवर्ण पदकाचा बचाव करत तिने पुन्हा एकदा सोन्यावर निशाणा साधला. अवनीने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्य अशी दोन पदके जिंकली होती. एका पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली. यंदाच्या पॅरालिम्पिकमध्येही तिने गोल्ड जिंकून आपल्या सुवर्ण पदकाचा बचाव केला. आज मंगळवारी ती पुन्हा एकदा अंतिम फेरीत खेळली. मात्र, महिला गटातील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारात अवनीला पदक जिंकण्यात अपयश आले.
खरे तर ५० मीटर रायफल थ्री पोझिशन SH1 प्रकारातील पात्रता फेरीतील अवनी लेखरा हिने ११५९-५९x गुणांसह सातव्या क्रमांकावर फिनिश करत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. त्यामुळे भारताला तिच्या रुपात आणखी एक पदक मिळेल असे अपेक्षित होते. परंतु, अवनीला पदक जिंकता आले नाही. याआधी अवनीने महिला १० मीटर रायफल स्टँडिंग SH1 प्रकारात भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले होते.
अवनीच्या जिद्दीला सलाम
टोकियो पॅरालिम्पिकप्रमाणे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देखील भारताच्या अवनी लेखराने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. यासह सुवर्ण पदकाचा बचाव करणारी ती पहिली खेळाडू ठरली. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. (avani lekhara medals) पॅरिस पॅरालिम्पिकमधले भारताचे हे पहिले पदक ठरले आणि तेही सुवर्णपदकच. सलग दुसऱ्यांदा पदक जिंकताच अवनी प्रसिद्धीच्या झोतात आली. मात्र, तिचा इथपर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय आहे. २०१२ मध्ये वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी अवनीच्या वाटेत मोठा अडथळा आला. एका अपघातामुळे तिला अर्धांगवायू (Paralysis) झाला आणि तिला चालण्यासाठी व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली. पण, अवनीने हार न मानता पुढे जाण्याचा निर्णय घेतला. अपघातानंतर अवघ्या तीन वर्षांनी अवनीने शूटिंगला आपले आयुष्य बनवले. अवघ्या काही वर्षात तिने गोल्डन कामगिरी करुन दाखवली. अवनीचे वडील प्रवीण सांगतात की, अपघातानंतर ती खूप शांत होऊ लागली. ती कोणाशीही बोलली नाही आणि पूर्ण तणावात गेली. या भीषण अपघातामुळे तिला खूपच त्रास सहन करावा लागला. ती इतकी अशक्त झाली होती की ती काहीच करू शकत नव्हती. हलकी वस्तू उचलणेही तिच्यासाठी कठीण होत होते.