सियाचीन ते टोकियो : अथक परिश्रमानं मराठमोळ्या अविनाशनं पटकावलं 'ऑलिम्पिक' तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 08:50 AM2019-10-05T08:50:28+5:302019-10-05T08:50:57+5:30

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील शुक्रवारची मध्यरात्र भारतीयांसाठी आनंदवार्ता घेऊन आली

Avinash Sable qualifies for 2020 Olympics, He sets a new national record in the 3000m steeplechase final in the Athletics World Champs | सियाचीन ते टोकियो : अथक परिश्रमानं मराठमोळ्या अविनाशनं पटकावलं 'ऑलिम्पिक' तिकीट

सियाचीन ते टोकियो : अथक परिश्रमानं मराठमोळ्या अविनाशनं पटकावलं 'ऑलिम्पिक' तिकीट

Next

जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील शुक्रवारची मध्यरात्र भारतीयांसाठी आनंदवार्ता घेऊन आली. त्यात ही गूड न्युज महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना अधिक जवळची वाटणारी होती. कारण महाराष्ट्रातीलबीड जिल्ह्यातील २५ वर्षीय अविनाश साबळेने जागतिक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर अविनाशने पुढील वर्षी टोकियोत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले. 

नात्यमय रित्या अंतिम फेरीत स्थान पक्के करणाऱ्या अविनाशने शुक्रवारी ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात ८ मिनिटे २१.३७ सेकंदाची वेळ नोंदवली आणि नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिक पात्रतेचे ८ मिनिटे २२ सेकंदाचे निकष पूर्ण केले. काही दिवसापूर्वी अविनाशने ८ मिनिटे २५.२३ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. आज त्याने तोही मोडला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाशचं धावण्याशी नातं जोडलं गेलं. त्याला रोज घर ते शाळा असा 6 किमीचा प्रवास पायी करावा लागायचा. 12वीनंतर तो भारतीय सैन्यात 5 महार रेजिमेंटमध्ये रूजू झाला. 2013-14साली त्यानं सियाचिन ग्लेशियरवर पोस्टिंग केली. 





 

Web Title: Avinash Sable qualifies for 2020 Olympics, He sets a new national record in the 3000m steeplechase final in the Athletics World Champs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.