Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने वाढवली देशाची शान! जिंकले ऐतिहासिक सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 08:09 PM2023-10-01T20:09:05+5:302023-10-01T20:09:29+5:30
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेल ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५०सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला. अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला.
Sunehra Pal 🟰 𝐒𝐔𝐍𝐇𝐄𝐑𝐀 𝐌𝐄𝐃𝐀𝐋🥇@Avinash3000m, take a Bow 🫡🇮🇳#TeamIndia#Cheer4India#Hangzhou2022#Hockey#AsianGames#IssBaar100Paar | @Media_SAIpic.twitter.com/nznpixvOpz
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) October 1, 2023
३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला आणि २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक मिळवून दिले आणि स्टीपल चेस स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले. अविनाश आता आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर शर्यतीतही सहभागी होणार आहे.
𝗔𝗩𝗜𝗡𝗔𝗦𝗛 𝗦𝗔𝗕𝗟𝗘 – Remember the name. He is destined for 𝙂𝙍𝙀𝘼𝙏𝙉𝙀𝙎𝙎 🫶 🇮🇳
The phenomenal athlete smashed the #AsianGames record with a timing of 8:19:50s to clinch #TeamIndia's first 𝗚𝗢𝗟𝗗 in Track & Field 🏃🏽@avinash3000m#SonySportsNetwork#Cheer4India… pic.twitter.com/sUKQwuzMVx— Sony Sports Network (@SonySportsNetwk) October 1, 2023
अविनाश ६ किलोमीटर धावत शाळेत जायचा
अविनाशच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने अॅथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये, आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.