धावताना मनाची अनुभूती जागवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:23 AM2019-12-29T01:23:57+5:302019-12-29T01:25:30+5:30

तुम्ही जर धावण्याच्या प्रेमात पडला असाल, तर तुम्ही निराश न होता आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि धावणे चालू ठेवा. ​​​​​​​

Awaken your mind while running ... | धावताना मनाची अनुभूती जागवा...

धावताना मनाची अनुभूती जागवा...

googlenewsNext

- रुचिरा दर्डा, महामॅरेथॉन संस्थापिका

नवरा-बायकोच्या नात्याचे बंध उलगडणे सर्वांत कठीण आहे. वर्ष-दोन वर्षे संसार केल्यानंतर एकत्र राहण्याची इच्छा नष्ट होत असताना समाजासाठी किंवा आपल्या वचनबद्धतेसाठी हे नाते टिकविण्यावर भर दिला जातो. मात्र, ही काही वर्षे काढल्यानंतर खऱ्या अर्थाने एकत्र असण्याचा आनंद अनुभवायला तुम्ही सुरुवात करता. प्रेम असो किंवा वजन कमी करण्याची गोष्ट असो, काम असो किंवा धावणे असो, या सर्वात सारखेपणा आहे. एका क्षणी आपला अपेक्षाभंग होणार, आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुन्हा प्रेम जुळण्याची प्रक्रिया सुरू होते.

१) सर्वात आधी विचार करा की, तुम्ही धावण्याचा निर्णय का घेतला?
धावण्याची लग्नाशी तुलना केली तर धावण्याचा निर्णय तुम्ही स्वत: (लव्ह मॅरेज) घेतला आहे की, दुसºयाच्या सांगण्यावरून (अ‍ॅरेंज मॅरेज)? मी धावणार हा निर्णय तुमच्यासाठी अवघड असेल आणि शिवाय तुम्ही हे दुसºया कोणाच्या सांगण्यावरून करीत असाल तर लवकरच तुम्ही कंटाळून जाल. तुम्हाला मित्राने हा निर्णय घेण्याचा सल्ला दिला किंवा पत्नीने निर्णय घेण्यास बाध्य केले? असो. तुम्ही इथपर्यंत आला आहात. तुमच्या आजूबाजूला असलेल्यांसाठी तुम्ही एक प्रेरणा ठरत आहात. तुम्ही यातून बाहेर पडण्याचा विचार करण्यापूर्वी या सर्व बाबींचा विचार करा. तुम्ही जर धावण्याच्या प्रेमात पडला असाल, तर तुम्ही निराश न होता आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि धावणे चालू ठेवा.
२) तुम्ही जेथे असाल तेथे पोहोचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे स्मरण करा.
तुम्ही त्यासाठी कसून मेहनत घेतली असून, घाम गाळलेला आहे, हे विसरता येणार नाही. घेतलेल्या मेहनतीचे चीज करायचे व पुढे वाटचाल करण्याची वेळ आलेली आहे हे जाणून घ्या; पण तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य होईल?
३) एक ब्रेक घ्या
धावपटू एक सामान्य चूक करतात. जर मी पूर्वी धावलो तर भविष्यातही धावू शकेल. निश्चितच, पण त्यालाही मर्यादा असतात. आपल्या सर्वांमध्ये सुप्त ऊर्जा असून, ती बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत असते. ज्यावेळी तुम्ही प्रथमच बाहेर पडता त्यावेळी उत्साह, भीती आणि काही प्रमाणात अहंकार तुम्हाला फिनिश लाईनपर्यंत घेऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला वाटते की तुम्ही धावू शकता. त्यानंतर तुम्ही पळू लागता आणि यशाची पुनरावृत्ती होत असते. त्यात तुम्ही तुमच्यापैकी काही सहकाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरताही, पण अल्पावधीतच तुमच्यातील उत्साह मावळतो. का?
अ) तुम्ही तुमच्या शरीराची तयारी करण्यास विसरता. धावणे ही अशी कृती आहे की त्यात तुमच्या शरीरातील प्रत्येक स्नायूचा सहभाग असतो. स्नायूंची शक्ती विकसित करणे धावण्यासाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे धावपटूंनी केवळ धावण्याच्या सरावाकडेच लक्ष न देता वेट ट्रेनिंग व योगा यावरही भर द्यायला हवा. आपल्या शरीराच्या सर्वांगीण विकासाचा परिणाम कामगिरीत दिसून येतो.
ब) जर तुम्हाला हे कळले असेल तर तुम्ही तज्ज्ञांचे अनुकरण केले आहे, अशी मला आशा आहे.
क) तुम्ही मला सांगा आपण आपल्यावरील ताण कसा मॅनेज करतो. लांब अंतर धावण्याचा सराव करताना दिनचर्या ढासळते. अनियमित दिनचर्येमुळे शरीरावर मानसिक व शारीरिक ताण येतो आणि थकवा जाणवतो. एक वेळ तुमचे मन तुम्हाला पुढे घेऊन जाईल, पण तुमची कामगिरी मात्र प्रभावित होईल. तुम्ही थकला आहात हे दिसून येईल.
ड) पोषण हा सर्वांसाठी महत्त्वाचा भाग आहे. योग्य आहार घेणे चांगले असले तरी धावपटूंचा आहार अधिक विशिष्ट असणे महत्त्वाचे आहे. का ? तुमचे पोट हलके असणे आणि स्नायूंना अधिक पोषण मिळणे आवश्यक आहे. खरे बघता ही क्लासिक कॅच २२ परिस्थिती. हे कसे मॅनेज करायचे यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
४) आपण वेगळ्या प्रकारे काय करू शकतो?
यंदाच्या मोसमात सरावादरम्यान अनेक पर्यायांची निवड करा. कणखर मानसिकतेसह आपले स्नायू बळकट करा. मोसम संपला म्हणून आपल्या दिनचर्येत बदल करू नका.
५) आपल्याला कुठला पल्ला गाठायचा आहे?
आपल्या स्वत:साठी ध्येय निश्चित करा. आपले लक्ष्य काय आहे? कधी कधी व्यस्त मानसिकतेच्या उत्साहात सरमिसळ होते; पण जर तुमचे लक्ष्य मोठे असेल, तर ते निश्चित करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने कार्य करणे आवश्यक असते. त्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात आपले शेड्युल निश्चित केले, तर ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कुणीच थांबवू शकत नाही.
६) आतापर्यंत निश्चयाने तुम्ही धावलात मग मध्येच धावणे सोडून का द्यायचे?
अजून बराच पल्ला गाठायचा आहे. अन्य कुणी हार मानतील; पण धावपटू कधीच थांबत नसतो, याची आपल्याला चांगली कल्पना आहे.

Web Title: Awaken your mind while running ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.